Lok Sabha Election  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबारमध्ये 10 ला पंतप्रधान मोदींची सभा

Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ १० मेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ १० मेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे ही माहिती दिली. श्री. बावनकुळे व भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत बाबा रिसॉर्ट येथे मतदारसंघातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. (Prime Minister Modi meeting in Nandurbar on 10 may )

त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांची नंदुरबारमधील चौथी सभा, तर डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी होणारी तिसरी जाहीर सभा असेल. नंदुरबार शहरालगतच्या धुळे रोडवरील मैदानावर ही सभा पार पडेल. गेल्या वेळेपेक्षा ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपस्थिती राहील, असा विश्वास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व उमेदवार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केला. (latest marathi news)

ते म्हणाले, की दौऱ्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे, त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका पार पडणे, जबाबदारीचे वाटप करणे सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, शहाद्याचे आमदार राजेश पाडवी, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार रंधे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष नीलेश माळी आदी बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT