Nandurbar News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूरला अवकाळी पाऊस!

सकाळ वृत्तसेवा

नवापूर, विसरवाडी (जि. नंदुरबार) : तालुक्यात अनेक दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल दिसून येत असून थंडीची लहर ये-जा करीत आहे. काल-परवा थंडी थोडी कमी झाली तर रविवारी (ता. २९) काही भागांत पावसाने अचानक हजेरी लावली.

वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारनंतर नवापूर तालुक्यातील विसरवाडी, खांडबारा, धायटा परिसरात अवकाळी मुसळधार पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावली. ( Nandurbar news Unseasonal rain in Nawapur)

हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. रब्बी हंगामातील पिके तसेच उघड्यावर असलेला शेतमाल व चाऱ्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. दुपारी तीनच्या सुमारास सुरवात झाली. शेतात चारा, उभे पीक, काढलेले पीक असल्याने त्याची आवराआवर करणे शक्य झाले नाही. शेतात दुपारच्या वेळेस बहुतांश महिला असतात, पुरुष मंडळी कामानिमित्त बाजारपेठेच्या गावाला गेलेली असल्याने मदत मिळू शकली नाही.

शेतात किंवा घरी वयोवृद्ध मंडळी असल्याने घराच्या छपरावर, खळ्यात टाकलेल्या आणि शेतातील मालाची आवरसावर करणे अवघड गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election: सातारा झेडपी निवडणुकीत इच्छुकांची चढाओढ; ३९ जागांसाठी महायुतीत ‘फिल्डिंग’, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्ष मैदानात!

कौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांच्या मुलाला पाच लाखात विकलं, धक्कादायक प्रकरण समोर; कुठं घडला प्रकार?

'आई तारी त्याला कोण मारी' डोळ्यात अंगार, हातात कुऱ्हाड ! प्रार्थनाच्या आगामी सिनेमाचं पोस्टर VIRAL

Latest Marathi News Live Update : मनमाड-येवला महामार्गावर टँकरचा अपघात

inspiring Story: ६७ वर्षीय ‘तरुणा’ची कमाल! वर्षभराच्या श्रमदानातून डोंगर खोदून साडेतीन किमी रस्ता तयार, नानांची जिद्द ठरली आदर्श..

SCROLL FOR NEXT