Child marriage
Child marriage esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार येथे बालविवाह थांबविण्यात पोलिसांना यश

धनराज माळी

नंदुरबार : गदवाणी (ता. अक्कलकुवा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तेथे जाऊन बालविवाह थांबविला, तसेच वधू-वरांच्या पालकांमध्ये जागृती करून नियमानुसार वय पूर्ण झाल्यावर नियोजित विवाह करण्याचा सूचना दिल्या.

गदवाणी (पो. जमाना, ता. अक्कलकुवा) येथील एका १७ वर्षीय मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध शुक्रवारी (ता. ३) काकरपाडाचा पाटीलपाडा (ता. धडगाव) येथील एका तरुणाशी विवाह होणार अल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिस अधीक्षक पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मोलगीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे यांना बालविवाह थांबविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार श्री. निळे यांनी नियोजित वराचे वडील शांताराम मुंगा वसावे (रा. काकरपाडाचा पाटीलपाडा) व मुलीचे वडील रायसिंग वेस्ता पाडवी (रा. गदवाणीचा कारभारीपाडा, ता. अक्कलकुवा) यांना तत्काळ मोलगी पोलिस ठाण्यात बोलविले. मुलीचे वय १७ वर्षे असून, ती अल्पवयीन आहे. कायद्याने मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे निश्चित केले आहे. त्यामुळे कायद्यानुसार गुन्हा ठरेल. कमी वयात मुलींचे विवाह झाल्यास त्याचा परिणाम तिच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतो. जन्माला येणाऱ्या अपत्यावर परिणाम होतो, असे समजावून सांगितले. दोन्ही पक्षांकडील लोकांनी ते मान्य केले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर नियोजित लावून देण्यात येईल, असे लेखी हमीपत्र पालकांनी लिहून दिले. त्यामुळे बालविवाह थांबविण्यात पोलसांना यश आले.

पालकांनी मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह करावा. नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला किंवा नंदुरबारच्या नियंत्रण कक्षात कळवावी.

-पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT