Sarpanch Manoj Chaudhary and villagers while distributing trees to the villagers by tractor. In the second photo, Sarpanch Manoj Chaudhary gifting trees to women at home. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : वृक्ष लागवड संवर्धन करा घर-पाणीपट्टीत सूट मिळवा; ग्रामपंचायतीकडून अनोखा उपक्रम

Nandurbar : वृक्ष लागवड करून काळजी घेतल्यास त्या वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टीमध्ये सूट वा प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम देण्याच्या निर्णय घेतला आहे.

कमलेश पटेल

Nandurbar News : जल, जमीन, जंगल, हो सबका मंगल या मूलमंत्रावर आधारित बामखेडा (ता. शहादा) ग्रामपंचायतीने पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन हा उपक्रम सुरू केला असून ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना प्रत्येकी पाच वृक्ष मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून तीन वर्षांपर्यंत वृक्ष लागवड करून काळजी घेतल्यास त्या वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टीमध्ये सूट वा प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम देण्याच्या निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. (Tree plantation conservation and Get discount in house watershed)

या उपक्रमात सर्व शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच मनोज चौधरी यांनी केले आहे. जमिनीवरील वाढते तापमान, प्रदूषण व यामुळे होतं असलेले नैसर्गिक असमतोल कमी करण्यासाठी जल, जमीन, जंगल संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला असून तसा ठरावही केला आहे.

ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत चार फूट उंचीचे आंब्याचे फळझाड रोपटे प्रत्येकी पाच वृक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच ते रोपटे शेतकऱ्यांनी शेतात किंवा जागा असेल तिथं लागवड करून एक ते तीन वर्षांपर्यंत संगोपन करून जगविल्यास आणि तो फोटो जिओ टॅगवर काढून वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत पाहणी केली जाईल. जे शेतकरी एक वर्ष ते तीन वर्ष वृक्षाचे संगोपन करतील, त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, असा हेतू ग्रामपंचायतीचा आहे. (latest marathi news)

नावीन्यपूर्ण उपक्रमात हातोटी

बामखेडा ग्रामपंचायत ही नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखली जाते. पाच वर्षांपूर्वी व्हिएसजीजीएमसारखी सामाजिक संघटना, पाणी फाउंडेशन व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून पाणी आडवा पाणी-जिरवा ही योजना यशस्वीरीत्या पूर्ण करून जलसंवर्धन उपक्रम राबविला. कोरोना काळातही ग्रामस्तरावर विविध उपाययोजना करून कोरोनाचा यशस्वी अटकाव करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली, तसेच गावासाठी रास्त व शुद्ध थंड पिण्याचे फिल्टर प्लांट सुयोग्य नियोजनाने ग्रामस्थांची तहान भागवत आहे.

गावाची लोकसंख्या जास्त व गावातील गल्ल्यांची समांतर व एकसारखी रचना असल्यामुळे बाहेरगावचे अतिथी, पाहुणे मंडळी यांना गोंधळल्यासारखे होतं किंवा एखाद्या नागरिकांचा पत्ता, घर शोधण्यासाठी अडचणीचे ठरत होते. म्हणून प्रत्येक गल्लीच्या प्रारंभी नदीचा नावाचे फलक लावून प्रत्येक गल्लीला ओळख दिल्यामुळे आता पत्ता शोधण्यास मदत होते. अशा वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे बामखेडा ग्रामपंचायत नेहमीच जिल्हाभर नावारूपाला आली आहे.

''वृक्ष लागवड व संगोपन उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबविण्याचे ठरवले, याला ग्रामसेवक, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा पाठिंबा मिळाला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळत आहे.''-मनोज चौधरी, सरपंच, ग्रामपंचायत बामखेडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT