Citizens taking a woman to hospital who fainted in the crowd while matching documents. the crowd of women gathered for documents in the office of the board officer in the city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar: कागदपत्रांची जुळवाजुळव करताना महिला श्‍वास गुदमरून कोसळली! ‘लाडकी बहिण’च्या लाभासाठी सेतू केंद्रांवर सर्वत्र गर्दी

Nandurbar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कागदपत्र जुळवण्यासाठी शहरातील शासकीय कार्यालय व सेतू केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिलांच्या रांगा पाहावयास मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

शहादा : राज्यात शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी महिलांची सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयांपुढे गर्दी होत आहे. सोमवारी (ता.१) शहरातील सेतू केंद्रात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलेली एक महिला गर्दीत श्‍वास गुदमरल्याने चक्कर येऊन पडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी संबंधित महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. (Nandurbar Woman fainted while matching documents Ladki Bahin scheme)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कागदपत्र जुळवण्यासाठी शहरातील शासकीय कार्यालय व सेतू केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिलांच्या रांगा पाहावयास मिळत आहे.

त्यातच शहरातील जुन्या तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी आलेल्या सीता योगेश ठाकरे (रा.टेक भिलाटी, शहादा) या महिलेला गर्दीत श्वास गुदमरल्याने चक्कर आल्याने ती रस्त्यावर पडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तेथे उपस्थित नागरिकांनी तत्काळ महिलेला रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (latest marathi news)

अटी-शर्थीमुळे कार्यालयात गर्दी....

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, परितक्त्या, विधवा महिलांसाठी आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते, रेशन कार्ड मध्ये महिलेचे नाव अंतर्भूत असावे, अशी अट असल्यामुळे सोमवार (ता.१) पासून शहादा येथील शासकीय कार्यालय व सेतू केंद्रात महिलांची व कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.

या योजनेत लवकर सहभागी होऊन आपणास लवकर मानधन मिळावे आणि यासाठी दिलेला पंधरा दिवसांचा अवधी म्हणजेच एक ते १५ जुलै २०२४ पर्यंत नाव नोंदणी करावयाचे असल्याने शहरामध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी शासनाकडून कागदपत्र जमवण्यासाठी जास्तीत-जास्त अवधी द्यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

Pune Crime : बाजीराव रस्त्यावर भरदिवसा थरार; तरुणाचा कुकरीने वार करून खून

'ठरलं तर मग' मध्ये अखेर अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री; 'हा' अभिनेता साकारतोय सुभेदारांच्या जावयाची भूमिका, चेहरा समोर

SCROLL FOR NEXT