Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. सेसमधून भजनी मंडळांना 1 कोटीचे साहित्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून ट्रॉली वैकुंठरथ घेण्यास मान्यता दिल्यानंतर सर्वसाधारण सभेने भजनी मंडळ साहित्य खरेदी करण्याच्या दाखल झालेल्या प्रस्तावाला मान्यता दिली.

अडीच कोटींच्या सेस निधीतून दीड कोटीचे वैकुंठरथ, तर एक कोटीचे भजनी साहित्य खरेदी केले जाणार आहे. पालकमंत्री कार्यालयाकडून आग्रह असल्याने हा प्रस्ताव रेटला जात असल्याची चर्चा आहे. (1 crore materials to Bhajani Mandals from Cess zp nashik news )

जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारकीर्द असून, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक आहेत. सर्वसाधारण सभेचे सर्व अधिकार प्रशासकांना देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी सेसच्या ६.५० कोटी रुपयांच्या निधीपैकी २.५० कोटी रुपयांच्या निधीतून ट्रॉली वैकुंठरथ व भजनी मंडळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी निधीचे पुनर्विनियोजन करण्यास मान्यता दिली.

सेसमधून कोणती कामे करायची, याची यादी ग्रामविकास विभागाने निश्चित केली आहे. या यादीत ट्रॉली वैकुंठरथ व भजनी मंडळ साहित्य खरेदी करण्याचा समावेश नाही. परंतु, पालकमंत्र्यांकडून या योजनांसाठी आग्रह सुरू आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत विभागाने या योजनेचा प्रस्ताव तयार करून ट्रॉली वैकुंठरथासाठी शासकीय तंत्र महाविद्यालयाकडून स्पेसिफिकेशन घेत त्यास गत सर्वसाधारण सभेत मान्यता घेतली होती. परंतु त्या वेळी मंडळांना भजनी साहित्य खरेदीस मान्यता मिळाली नव्हती. मंगळवारी (ता. ३१) झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायतीकडून आलेल्या या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

अडीच कोटीच्या तरतुदीतून एक कोटीचे भजनी साहित्य खरेदी केली जाणार आहे. मंडळांना भजनी साहित्य खरेदी करावयास मान्यता मिळालेली असली, तरी प्रत्यक्षात किती खरेदी होणार, याचे वाटप कसे होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबत ग्रामपंचायत विभाग कसे नियोजन करेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT