Onion News esakal
नाशिक

Nashik Onion News : कांद्याची तब्बल 100 कोटींची उलाढाल ठप्प; लिलाव बंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : जिल्ह्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे गत पाच दिवसांत कांदा लिलाव न झाल्याने जिल्ह्यात ७.५ लाख क्विंटलवर आवक तुंबली आहे; तर तब्बल १०० कोटींवर उलाढाल ठप्प झाली.

कांदा लिलाव होत नसल्याने कांदा सडत असून, पावसामुळे कांदा सडण्याचा वेग वाढत आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. (100 crores worth of onion turnover has stopped nashik onion news)

गणेश चतुर्थीची सुटी व त्यानंतर २० सप्टेंबरपासून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने राज्य व केंद्र सरकारकडे कळविलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने कांदा बाजार विस्कळीत झाला आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

त्यानंतर येवल्यात व्यापारी असोसिएशनने बैठक घेत चर्चा केली. दोन-अडीच तास चाललेल्या या बैठकीतूनही निर्णय झाला नाही.

केंद्र सरकार महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून, निर्यातशुल्क वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, तो कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नाही, बंद असाच सुरू राहील, असा एकमुखी निर्णय व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी बंदचा निर्णय कायम ठेवल्याने पाच दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव होऊ शकलेले नाहीत.

दररोज साधारण दीड लाख क्विंटलवर कांद्याची आवक बाजार समितीत होत असते. परंतु, पाच दिवसांपासून लिलाव न झाल्याने साडेसात लाख क्विंटलवर कांद्याची विक्री झालेली नाही. सरासरी बाजार समित्यांमध्ये २० ते २५ कोटींची उलाढाल होत असते. चार दिवस लिलाव न झाल्याने सरासरी १०० कोटींहून अधिक उलाढाल ही ठप्प झालेली आहे.

यापूर्वी उत्पादन खर्चाच्या खालील दराने विक्री करण्याची वेळ आली, तर आता विक्री व्यवस्था अडचणीत आल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो. कांद्याची आवक बाजार होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा सडत आहे. यातच जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. त्यामुळे हवामानात बदल होत आहे. याचा फटका कांदा सडण्याच्या वेगवाढीवर होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT