Social worker R while distributing materials to the adopted children in the integrated project office. P. Kuvar. Including Integrated Project Officer. esakal
नाशिक

100 कुपोषित बालक दत्तक; निवृत्त नायब तहसिलदारांचे दातृत्व

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : देशात स्वातंत्र्याच्या ७५ व्या रौप्य महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. रौप्यमहोत्सवचे औचित्य साधून येथील निवृत्त नायब तहसीलदार तथा सामाजिक कार्यकर्ते आर. पी. कुवर यांनी १०० कुपोषित बालके दत्तक घेण्याच्या निर्धार घेतला होता.

त्यांनी येथील राष्ट्रीय एकात्मिक प्रकल्प कार्यालयात वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील दोन बालके दत्तक घेऊन १०० बालके दत्तक घेण्याचा मानस पूर्ण केला आहे. (100 malnourished children adopted Donation of Retired Deputy Tahsildar R P kuwar nashik Latest Marathi News)

शंभर बालके दत्तक घेऊन त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्री. कुवर यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे अनके प्रश्‍न शासनदरबारी मांडून सोडविले आहे. कुवर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.

१०० कुपोषित बालके दत्तक घेतल्याने त्यांच्या या कामाची ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड’, तसेच ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. दत्तक घेतलेल्या बालकांना कुवर परिवारातर्फे वर्षभर शैक्षणिक खर्च केला जाणार आहे. त्यांनी दत्तक बालके घेण्याच्या या मोहिमेचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

या वेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, एकात्मिक प्रकल्प अधिकारी एस. अहिरराव, डाक विभागाचे उपअधिक्षक संदीप पाटील, निमगावचे माजी सरपंच दुर्गादास नंदाळे, भागचंद तेजा, बळीराम अहिरे, जे. के. रॉय, के. आर. मोरे, जे. एस. देसाई, ओ. पी. सावंत, एस. एम. तडवी, यु. बी. ठोके, अरुणा देवरे, भारती बोराळे, आय. बी. शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

SCROLL FOR NEXT