District Chief Vijay Karanjkar, Municipal Chief Sudhakar Badgujar, Ajay Boraste, Datta Gaikwad, Vilas Shinde while giving the bundle of oaths to party chief Uddhav Thackeray. esakal
नाशिक

शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना दहा हजार शपथपत्र

विक्रांत मते

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र सवतासुभा उभा केल्यानंतर शिवसेनेत मोठे फूट पडल्याचे राजकीय पातळीवर दिसत असले तरी संघटना मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे नाशिकमधून ११००० प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत सोमवारी (ता. ८) ९६७६ शपथपत्रांचा गठ्ठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला.

संपूर्ण शहरात सिडको विभागात सर्वाधिक पाच हजार १०० प्रतिज्ञापत्र दाखल झाले. पुढील काही दिवसात १३०० प्रतिज्ञापत्र भरून अकरा हजाराचा आकडा पूर्ण केला जाणार असल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. (10000 affidavit from Shiv Sena to Uddhav Thackeray nashik Maharashtra Political News)

जून महिन्यात राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक आटोपल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदार सुरत मार्गे गुवाहाटी येथे पोचून शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावरर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा करण्यात आली.

शिंदे गटाची भूमिका सरकार स्थापनेपर्यंतच होती असे नाही तर संघटनेवरदेखील त्यांनी दावा केला. शिवसेनेच्या प्रतोदकडून बजावण्यात आलेले व्हीप धुडकावण्यात आले. थेट न्यायालयात आवाहन देताना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरदेखील शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या मैदानात उतरले.

त्यानंतर शिवसेनेची एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी शपथपत्र भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. शहरातून ११ हजार शपथपत्र भरून देण्याचे निश्चित करण्यात आले. ९६४७ शपथपत्रांचा गठ्ठा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, उपनेते बबन घोलप, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

नोंदणीकडे लक्ष्य केंद्रित

सिडको व सातपूर अर्थात पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक पाच हजार १०० शपथपत्रे भरून देण्यात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून बाराशे, तर पंचवटी व नाशिक रोड अर्थात पूर्व विधानसभा मतदारसंघातून ३४०० प्रतिज्ञापत्र भरून देण्यात आली. उर्वरित तेराशे प्रतिज्ञापत्र लवकरच भरून दिली जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेने आता सभासद नोंदणीकडेदेखील लक्ष केंद्रित केले असून, जिल्ह्यातून एक लाख सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

SCROLL FOR NEXT