fund esakal
नाशिक

Goda Mahaarti : गोदाआरतीच्या 11 कोटी 66 लाखांना प्रशासकीय मान्यता

दक्षिणगंगा अशी ओळख असलेल्या गोदावरीच्या आरतीसाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ६६ लाखांच्या आराखड्यास बुधवारी (ता. १४) प्रशासकीय मान्यता दिली.

सकाळ वृत्तसेवा

Goda Mahaarti : दक्षिणगंगा अशी ओळख असलेल्या गोदावरीच्या आरतीसाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ६६ लाखांच्या आराखड्यास बुधवारी (ता. १४) प्रशासकीय मान्यता दिली.

जिल्हा महसूल प्रशासनाला दोन दिवसांत हा निधी उपलब्ध झाल्यानंतर पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (11 Crore 66 Lakhs of God Aarti administrative approval nashik news)

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने १२ कोटी ६६ लाखांच्या कामांचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंत्री मुनगंटीवार यांनी मंजुरी देत ११ कोटी ६६ लाखांना मंजुरी दिली. वाराणसीच्या धर्तीवर गोदाआरती सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला.

गोदाआरतीचा मूळ आराखडा ५६ कोटी ४५ लाखांचा असून, त्यात अनेक बाबींचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आराखडा राज्य शासनाकडे सुपूर्द केला आहे. त्यात दुरुस्ती करून फेरआढावा सादर करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. मात्र, एवढा मोठा आराखडा लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करणे शक्य होणार नाही.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात आवश्यक बाबींचा समावेश करून दहा कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने १२ कोटी ६६ लाखांचा आराखडा तयार करून तो २ फेब्रुवारीला सादर केला.

जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ६६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग आठ दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून ५ मार्चपूर्वी कायार्रंभ आदेश देण्याची कार्यवाही करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

धर्मांतर केल्याने मुस्लिम आरक्षणाचा हक्क मिळत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सरकारी आदेश घटनाबाह्य ठरवला

Tukaram Mundhe: ''नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमानाचे व्यवस्थापन नव्हे, तर...'', तुकाराम मुंढेंनी व्यक्त केल्या भावना; काळ्या बाजाराचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT