Admission esakal
नाशिक

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशाची शुक्रवारपर्यंत मुदत; पाचव्‍या विशेष फेरीत 219 विद्यार्थ्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : दहावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्‍ध करून देण्यासाठी राबविलेल्‍या पाचव्‍या विशेष फेरीची गुणवत्तायादी सोमवारी (ता. ११) प्रसिद्ध झाली.

फेरीत सहभागी २३९ पैकी २१९ विद्यार्थ्यांचा यादीत समावेश आहे. यांसह कोट्याच्‍या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. १५)पर्यंत मुदत आहे. (11th admission deadline till 15 september nashik news)

शिक्षण विभागामार्फत नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. एकूण ६६ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यापूर्वी तीन नियमित आणि चार विशेष फेऱ्या झाल्या ‍होत्‍या.

काही दिवसांपूर्वी दहावीच्‍या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करण्याच्‍या हेतूने पाचव्‍या विशेष फेरीची प्रक्रिया राबविण्यात आली.

यापूर्वी झालेल्‍या फेऱ्यांनंतर आठ हजार २९७ जागा रिक्‍त असताना पाचव्‍या विशेष फेरीत अवघ्या २३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्‍यांच्‍यातून २१९ विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश केला असून, त्‍यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रथम प्राधान्‍याचे मिळाले महाविद्यालय

यादीतील २०८ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्‍याचे महाविद्यालय मिळाले आहे. नऊ विद्यार्थ्यांना दुसऱ्या, दोन विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थी राज्‍यातील शिक्षण मंडळाचे विद्यार्थी आहेत.

शाखानिहाय फेरीतील स्‍थिती अशी-

शाखा अर्जदार विद्यार्थी निवड झालेले विद्यार्थी

विज्ञान ८५ ८४

वाणिज्‍य ८८ ७३

कला ५७ ५३

एचएसव्‍हीसी ९ ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT