Crime esakal
नाशिक

Nashik Crime: इंदिरानगरमधून 12 गायींची सुटका

मुमताज नगरमध्ये लष्कराच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या पत्राच्या शेडवर शुक्रवारी (ता.५) सकाळी छापा टाकून पोलिसांनी कत्तलीच्या इराद्याने आणलेल्या १२ गोवंशांची सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

वडाळा : मुमताज नगरमध्ये लष्कराच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या पत्राच्या शेडवर शुक्रवारी (ता.५) सकाळी छापा टाकून पोलिसांनी कत्तलीच्या इराद्याने आणलेल्या १२ गोवंशांची सुटका केली.

याप्रकरणी कयूम रशीद शेख ऊर्फ बबलू कुरेशी, नासिर कयूम शेख यांच्यासह ७ ते ८ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (12 cows rescued from Indiranagar Nashik Crime)

यात सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात गायी आणि पाच गोऱ्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त जनावरांचे मांसही मिळून आले. कारवाईत दोन चारचाकी, दुचाकी, लोखंडी धारदार पाते, कुऱ्हाड, लोखंडी टोचे आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार, पोलिस हवालदार महेश पारनकर, मन्सूर शेख, प्रवीण पगारे, शाळिग्राम झिरवाळ, सागर परदेशी, जावेद खान, अमजद पटेल, दीपक पाटील, भागवत शिर्के, राजाराम बाळनोथ, वसंत ढगे, प्रकाश नागरे, विशाल पाठक यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT