12 Vacancies of Assistant Conservator of Forests nashik news esakal
नाशिक

Nashik News : सहाय्यक वनसंरक्षकांच्या 12 जागा रिक्त; अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील सहाय्यक वनसंरक्षकांना पदोन्नती मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील १२ जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित नऊ वनसंरक्षकांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याने नांदूरमध्यमेश्वर, कळसूबाई, हरिश्चंद्रगडसारख्या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

पश्चिम नाशिक वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक अश्विनी खोपडे व पूर्वचे सहायक वनसंरक्षक संजय मोरे यांचा पदभार अनिल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. (12 Vacancies of Assistant Conservator of Forests nashik news)

पूर्व वन विभागाच्या वनीकरण व वन्यजीव संरक्षण पदाचा अतिरिक्त कार्यभार सुजित नेवसे यांच्याऐवजी मूल्यांकनाचे सहायक वनसंरक्षक जितेंद्र कोहाळे यांना देण्यात आला आहे.

नाशिक वनवृत्ताचे सहायक वनसंरक्षक पदाचा कार्यभार सहायक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नाशिक वन्यजीव विभागातील कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांचा अतिरिक्त कार्यभार राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रेय पडवळे यांच्याकडे तसेच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या तृप्ती निखाते यांचा पदभार वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त विभागीय वनाधिकारी (योजना) ची जबाबदारी दक्षताचे विभागीय अधिकारी विशाल माळी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अहमदनगरमध्येही तीच परिस्थिती

अहमदनगर वनीकरण वन्यजीव पदाचा पदभार संगमनेरचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील यांच्याकडे, तर अहमदनगर अतिरिक्त रोहयो-कॅम्पचा कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्याकडे सोपवला आहे. रिक्त जागा केव्हा भरण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रिक्त जागा

पूर्व विभाग- ४ (३ प्रादेशिक व १ सामाजिक वनीकरण)

पश्चिम विभाग- २ (प्रादेशिक)

नगर विभाग- ३ (२ प्रादेशिक व १ सामाजिक वनीकरण)

वन्यजीव विभाग- २

मुख्य वनसंरक्षक कार्यालय- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT