128 mm of rain recorded in 48 hours in igatpuri nashik news esakal
नाशिक

Nashik Rain Update : इगतपुरीत वरुणराजाची आबादानी; 48 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात वरुणराजाने मर्जी दाखवित कालपासून पुन्हा जोरदार वृष्टी सुरू केली आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्यात तर धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

दोन दिवसांच्या पावसाने तालुक्यातील भावली, भाम, दारणा धरणाच्या साठ्यात भरीव वाढ झाल्याने तालुक्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४८ तासात १२८ मिलीमीटरची बरसात केली असून आजअखेर तालुक्यात १ हजार ४५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. (128 mm of rain recorded in 48 hours in igatpuri nashik news)

इगतपुरी तालुक्यात कालपासुन शहरासह घोटी व भावली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. आजही हा पाऊस कायम होता. या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कसारा घाटातही मुसळधार पावसासह मुंबई आग्रा महामार्गावर धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्यात सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाल्याने भात लागवडीच्या कामाला गती आली आहे.

तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसाने धरणसाठ्यांत चांगलीच वाढ झाली. भावली धरणात ८७.१७ टक्के तर दारणा धरणात ७५.१८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तालुक्यात ४८ तासात १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील दारणा, भाम व भावली नद्या प्रवाहित झाल्या आहेत.

शेतकऱ्यांत समाधान

महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी शहरासह तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून संततधारेसह मुसळधार पाउस कोसळत आहे. गेल्या २४ तासांत ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याबरोबरच तालुक्यातील पूर्व भागाचा काहीसा अपवाद वगळता चौफेर दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. भात लागवडीच्या कामांची पहाटेपासूनच लगबग सुरु झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाश्चिम भागात फटकेबाजी

तालुक्याच्या पाश्चिम भागात पावसाच्या समाधानकारक हजेरीने भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील त्रिंगलवाडी, बलायदुरी, आडवण, टाकेघोटी, बोरटेंभे, भावली, मानवेढे, बोर्ली, गिरणारे, टिटोली, नांदगावसदो, पिंपरीसदो, तळेगाव, आवळखेड, दौंडत, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव, खंबाळे, इंदोरे, गिरणारे, काळुस्ते, शेनवड, मुंढेगाव, माणिकखांब या भागातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

शनिवारअखेरचा धरणांतील साठा

दारणा : ७५.८१ टक्के

मुकणे : ५४. २१ टक्के

वाकी : १८.७९ टक्के

भावली : ८७.१७ टक्के

भाम : ४७.३६ टक्के

कडवा : ३२.६६ टक्के

वालदेवी : २३.०४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT