For the first time in 134 years Devmamaledars Yatra festival has been canceled nashik marathi news 
नाशिक

१३४ वर्षांनंतर प्रथमच देवमामलेदारांचा यात्रोत्सव रद्द; शहरातील लाखोंची उलाढाल थांबणार

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरात सलग १५ दिवस चालणारा यात्रोत्सव आणि ऐतिहासिक रथ मिरवणूक यंदा १३४ वर्षांत प्रथमच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टने जाहीर केले.

व्यावसायिकांचे मोठे नुकसान 

येत्या मार्गशीर्ष वद्य एकादशी म्हणजेच ९ जानेवारीला प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते देवमामलेदारांचा विधिवत अभिषेक व महापूजा करून सांगता समारंभ होणार आहे. दरम्यान, यात्रोत्सव रद्द झाल्याने शहरातील लाखोंची उलाढाल थांबणार असून, व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. परंपरेनुसार बागलाणचे तहसीलदार, नगराध्यक्ष व देवस्थान अध्यक्ष यांच्या हस्ते मार्गशीर्ष वद्य एकादशी (ता.९)ला देवमामलेदारांची पहाटे महापूजा व अभिषेक होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त शहरवासीयांचे प्रमुख आकर्षण असलेली रथ मिरवणूकही यंदा रद्द करण्यात आल्याने सर्वत्र निरुत्साह आहे. मात्र या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार असल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे. 

कोरोना संसर्गामुळे यंदाचा देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव आणि रथ मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शासकीय नियम व आदेशानुसार अभिषेक महापूजा होणार आहे. भाविकांसाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. 
-भालचंद्र बागड, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, सटाणा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

Sahyadri Tiger Reserve : वाघांच्या वाढीसाठी राधानगरी ठरतंय 'सेफ झोन'; सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर 'राणोजी'वर शिक्कामोर्तब! पर्यटनाला मिळणार गती

Latest Marathi News Live Update : भोंदू खरात प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचा संबंध

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

Horoscope : उद्या बनतोय प्राप्तीयोग! 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा; एका रात्रीत घडेल मोठी घटना, नोकरी-धंद्यात टर्न

SCROLL FOR NEXT