Dengue Infection esakal
नाशिक

Nashik Dengue Update : डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यात तब्बल दीडशे डेंगी रुग्ण

मलेरिया विभागाने डेंगीचे उत्पत्ती स्थानी आढळणाऱ्या ठिकाणच्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात डेंगीचे तब्बल दीडशे नवीन रुग्ण आढळून आल्याने मलेरिया विभागाने डेंगीचे उत्पत्ती स्थानी आढळणाऱ्या ठिकाणच्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत. (150 dengue patients in the last 2 weeks of December Nashik Update)

ऑगस्ट महिन्यात डेंगी ४७ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात २६१, तर ऑक्टोबर महिन्यात १९३ रुग्ण आढळले. नोव्हेंबर महिन्याचा तब्बल २७५ जणांना डेंगी असल्याचे आढळून आले.

डिसेंबर महिन्यात २०६ नवीन डेंगी बाधित रुग्ण आढळून आले. यातील दीडशे रुग्ण डिसेंबरच्या अखेरच्या दोन आठवड्यात आढळून आले. त्यामुळे डेंगी बाधितांचा एकूण आकडा एक हजार १९१ च्या वर गेला आहे.

डेंगी डासांची उत्पत्ती स्थाने आढळल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिकांसह नागरिकांना नोटिसा बजावल्या जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात सिडकोतील डीजीपीनगर-कामटवाडे परिसरातील एका व्यक्तीचा डेंगीने मृत्यू झाला होता.

म्हसरुळ भागातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला डेंगीचे लागण होऊन बळी गेला होता. मागील वर्षात डेंगीचे दोन बळी गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT