Officials while distributing the approval letter of Shravan Bal Yojana to the beneficiaries through the efforts of Shri Krishi Sevak Atmasanman Baliraja Seva Sangh. esakal
नाशिक

Shravanbal Yojana : मालेगावला 150 कुटुंबांना मिळणार श्रावणबाळ योजनेचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

Shravanbal Yojana : श्री कृषीसेवक आत्मसन्मान बळीराजा सेवा संघाच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील १५० वयोवृद्धांना श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थी मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. संजय गांधी व श्रावणबाळ निराधार विभागाकडून प्राप्त झालेल्या मंजुरी पत्र संबंधितांना संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. (150 families will get benefit of Shravanbal Yojana in Malegaon nashik news)

तालुक्यातील अनेक गरीब, आदिवासी, वृद्ध व्यक्ती हे शासनाच्या श्रावणबाळ योजनेपासून वंचित होते. यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. काही दिवसांपूर्वी लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे काही वृद्ध नागरिकांनी कैफियत मांडली.

पाठपुरावा करूनही तहसील कार्यालयातून कागदपत्र मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. श्री. दिघावकर यांनी या प्रकरणी लक्ष घालत श्री कृषीसेवक बळीराजाचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, संचालक राहुल पवार यांना तातडीने संबंधित गावांमध्ये शिबिर घेण्यास सांगितले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

श्री कृषीसेवक बळीराजा आत्मसन्मान संघाने पुढाकार घेऊन योजनेपासून वंचित कुटुंबीयांचा शोध घेतला. डॉ. दिघावकर यांनी संबंधित महसूल व पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना श्रावणबाळ योजनेतील गरजू वृद्धांसाठी श्रावण बाळ योजनेतील प्रकरण मंजूर करण्यास सांगितले.

संघाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा व महसूल अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तब्बल १५० लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र मिळाले. अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, प्रतीक्षा भोसले, किरण यादव, राजेंद्र पवार, निवृत्त पोलिस उपअधीक्षक लता दोंदे, यशवंत शिरसाठ, मोठाभाऊ दळवी आदींच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT