डाळिंबबाग.jpg 
नाशिक

डाळिंब नोंदणीत महाराष्ट्राचे अव्वलस्थान !...'नाशिक'चाही यात खारीचा वाटा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : निर्यातीसाठी "ऍपेडा'तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणाली त डाळिंबाच्या एक हजार 441 आणि आंब्याच्या 42 हजार 477 बागांची नोंदणी झाली आहे. डाळिंब नोंदणीत एक हजार 271 बागा महाराष्ट्रातील असून, आंब्याच्या सर्वाधिक 16 हजार 529 बागा तेलंगणामधील आहेत. कर्नाटकमधील दहा हजार 495 आणि महाराष्ट्रातील सात हजार 984 बागांचा नोंदणीमध्ये समावेश आहे.

कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येक एका बागेची नोंदणी

डाळिंब नोंदणीत महाराष्ट्राने अव्वलस्थान कायम राखले आहे. त्यात औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, वर्धा जिल्ह्यातील बागा आहेत. याखेरीज आंध्र प्रदेशातील 44, गुजरातमधील 124, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येक एका बागेची नोंदणी झाली आहे. प्रणालीत नोंदविलेल्या आंबाबागांची संख्या राज्यनिहाय पुढीलप्रमाणे - आंध्र प्रदेश - चार हजार 439, गुजरात - दोन हजार 188, केरळ - 113, तमिळनाडू -159, उत्तर प्रदेश - 570 लिंबूवर्गीय फळांच्या नोंदणीला सुरवात झाल्याने महाराष्ट्रातील 45 बागा निर्यातीसाठी नोंदणी झाल्या आहेत. 

भेंडी, हिरव्या मिरचीची निर्यात
 
भाजीपाल्यामध्ये भेंडी आणि हिरव्या मिरचीच्या निर्यातीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रस दाखविला आहे. भेंडीच्या निर्यातीसाठी महाराष्ट्रातील 339, गुजरात मधील 16, कर्नाटकमधील 12, उत्तर प्रदेशातील नऊ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंद केली. हिरव्या मिरचीचे महाराष्ट्रातील 65, उत्तर प्रदेशातील 93, पश्‍चिम बंगालमधील नऊ असे 167 शेतकरी सहभागी झाले आहेत.

ऑनलाइन नोंदणीची संख्या (भाजीपाला उत्पादक शेतकरी) 

कारले -----------   महाराष्ट्र 2, उत्तर प्रदेश- 20 
दुधी भोपळा -----  महाराष्ट्र 3, उत्तर प्रदेश- 32 
शेवगा ------------  महाराष्ट्र- 1 
वांगी -------------  महाराष्ट्र- 22, उत्तर प्रदेश- 26 
सोयाबीन --------  महाराष्ट्र- 3 
चवळीच्या शेंगा -- उत्तर प्रदेश- 14 
बटाटा ------------- उत्तर प्रदेश- 45  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Treatment Breakthrough : कर्करोगावर क्रांतीकारी बदल, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ ऐवजी मिळणार ‘इम्युनोथेरपी’; रुग्णांचे आयुष्य वाढणार

Bhima River Water issue: भीमा नदी पाणीप्रश्नी काँग्रेस-भाजप आमने-सामने; श्रेयवादात प्रणिती शिंदेंनी मारली बाजी!

दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल, मृतदेह ओळखणंही कठीण

Gold Silver Price Drop : सोने, चांदी दर आणखी कमी होणार, एका आठवड्यात ३ हजारांची घसरण, खर कारण आलं समोर

Government Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इच्छापत्रांसाठी स्वतंत्र यंत्रणा; महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांकडे जबाबदारी..

SCROLL FOR NEXT