167 trainees of Maharashtra Police Academy are found to be infected with corona 
नाशिक

धक्कादायक! महाराष्ट्र पोलिस अकादमीत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना बाधित; महापालिकेचा वैद्यकीय विभाग हादरला

विक्रांत मते

नाशिक : पोलिस अधिकारी व शिपायांना प्रशिक्षण देणाया महाराष्ट्र पोलिस अकादमी मध्ये गेल्या आठ दिवसात १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना बाधित आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग हादरला असून तातडीने संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसात नव्याने सहाशे प्रशिक्षणार्थींच्या रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाधितांपैकी १२१ प्रशिक्षणार्थींना ठक्कर डोम येथील कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

लग्नसोहळ्यासाठी सुट्टीवर गेला अन्

राज्यभरातील पोलिस अधिकारी व शिपायांना त्र्यंबकरोडवरील पोलिस अकादमी मध्ये प्रशिक्षण दिले जाते. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण दिले जाते होते. सरावावेळी अंतर राखून शारीरीक प्रशिक्षण दिले जाते. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नियमित सराव सुरु करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थींना नियमित व साप्ताहीक सुट्ट्या देखील सुरु झाल्या आहेत. पंधरा डिसेंबर पुर्वी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एका प्रशिक्षणार्थीला सुट्टी देण्यात आली. पंधरा डिसेंबरला अकादमी मध्ये परतल्यानंतर संबंधित कर्मचायाला अस्वस्थ वाटू लागले. तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोळा डिसेंबरला ४२१ प्रशिक्षणार्थींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यात १५१ बाधित आढळले.

तब्बल १४०० जणांचे अकादमीमध्ये वास्तव्य

महापालिकेकडे बाधितांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नव्याने ४७२ प्रशिक्षणार्थींची रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यात आणखी पंधरा जण पॉझिटिव्ह आढळले. स्वॅब व रॅपिड ॲण्टीजेन मिळून एकुण ८९४ तपासण्या करण्यात आल्या. त्यातून १६७ बाधितांचा आकडा समोर आला आहे. अकादमी मध्ये सातशे प्रशिक्षणार्थी, कॅण्टीन, हॉस्टेल व अन्य सातशे असे एकुण १४०० जण अकादमी मध्ये वास्तव्याला आहे. ८९४ जणांची तपासणी झाली असून उर्वरित ५०६ जणांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. बाधित आढळलेल्यांपैकी बहुतांश पोलिस उपनिरीक्षक असून त्यांना ठक्कर डोम कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर प्राणवायु पातळी खालावलेल्यांना मविप्र व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

संपर्कातील तपासणी 

१६७ बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची देखील तपासणी केली जाणार आहे. संपर्कातील लोक बाहेरगावी असतील तर त्या यंत्रणेला कळविले जाणार आहे. पोलिस अकादमी मध्ये महापालिकेचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून जंतुनाशक औषधांची फवारणी केली जाणार आहे. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी दिली. 

 

पोलिस अकादमीत पंधरा डिसेंबर पासून आठ दिवसात १६७ कोरोना बाधित आढळल्याने हि धक्कादायक बाब आहे. बाधितांना विलगिकरण कक्षात हलविण्यात आले आहे. संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT