bike-fire esakal
नाशिक

Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात टोळक्यांनी व गुंडांनी (Goons) वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने चालविला आहे. यामुळे शहराला वेठीस धरण्याचा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. येथील देवीचा मळा भागात दहशत निर्माण करत शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री टोळक्याने (Mob) धुडगूस घातला. संतप्त झालेल्या जमावाने टोळक्यास हाकलून लावतानाच त्यांच्या दोन दुचाकी जमावाने जाळून (Bike Burnt) टाकल्या. शाह प्लॉट भागात हा प्रकार घडला. (2 bikes burnt by mob in Devicha mala area Nashik Crime News)

गुन्हेगारी पाश्‍र्वभूमीवर असलेल्या टोळक्याने दुचाकीवर येत शाह प्लॉट भागात गोंधळ व आरडाओरड करण्यास सुरवात केली. नागरिकांनी विरोध केल्यानंतर टवाळखोर पळू लागले. या गदारोळात संबंधितांच्या दोन दुचाकी घटनास्थळी राहून गेल्या. संतप्त जमावाने दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. दुचाकींचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव, पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत भोये व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. यापूर्वीही संबंधित टोळक्याने तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता, असे येथील रहिवाशांनी सांगितले. पवारवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याप्रकरणी दंगल व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: तुरुंगवास टळला… पण दोष माफ नाही! माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात हायकोर्टाचा असा निर्णय की राजकारण हादरलं

मोठी बातमी! आगामी भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार नाही एकही शिक्षक; ‘हे’ आहे कारण, डिसेंबरअखेर अंतिम होणार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

SCROLL FOR NEXT