Items looted in a daring midnight burglary by thieves in Parbat Nagar on Malegaon Road. esakal
नाशिक

Nashik Crime News : एकाच रात्री 2 धाडसी घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, मालेगाव रस्त्यावरील पर्बत नगरमध्ये मंगळवारी (ता. ११) मध्यरात्री एकाच वेळी दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या, तर एका घरात चोरीचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बाजार समिती आवारातून ट्रॅक्टर चोरीच्या प्रयत्नाची घटना ताजी असतानाच बाजार समितीसमोरील भरवस्तीतील पर्बत नगरमध्ये दोन्हीही घरांचे कुलूप तोडत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. (2 burglaries in one night at satana Nashik Latest Crime News)

गेल्या वर्षी दीपावलीच्या सुमारास मालेगाव रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रकार घडला होता. तर याच रस्त्यावर असलेल्या बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून डिझेल व स्पेअरपार्टस चोरीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी बाजार समितीच्या आवारातून कांद्याने भरलेला ट्रॅक्टरच चक्क चोरी करून घेऊन जात असल्याचा प्रकार सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. या सर्व घटना ताज्या असतानाच मालेगाव रस्त्यावरील पर्बतनगर भागात मंगळवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास दोन घरफोड्या होऊन चोरट्यांनी रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची चोरी करून पोबारा केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पर्बतनगर भागात चोरट्यांनी मध्यरात्री घराला कुलूप असल्याचा फायदा घेवुन शुभम किशोर देवरे, केवळ विठ्ठल शिंदे यांच्या घराचे कडी- कोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास केल्या. चोरट्यांनी रमेश धोंडगे यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घराला आतून कडी असल्याने चोरी न करता चोरट्यांनी तेथून पळ काढला.

पोलिस गस्त वाढवा

दरम्यान, नागरीकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन सटाणा पोलिस प्रशासनाने केले आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास गस्त घालणारे साथी गेल्या काही महिन्यांपासून शहरात मध्यरात्री गस्तीवर फिरत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवर वचक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT