Crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिक रोड पोलिसांकडून 2 मोठ्या चोरीची उकल..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने चोरी गेलेली तेवरा गाडी व बांधकाम साइटवर लागणारे लोखंड, रिक्षासह ताब्यात घेऊन सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करून दोन संशयिताना जेरबंद केले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांनी अवघे काही तास उलटत असताना दोन मोठ्या चोरीची उकल केली आहे. (2 major thefts solved by Nashik Road Police nashik crime news)

याबाबत पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी माहिती दिली. १३ मार्चला शिंदे गाव येथून बाळकृष्ण शंकर सोनवणे यांची तेवरा कार (एमएच- १५- बीएक्स- ५६१६) चोरी झाली होती. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तालुका कारंजा लाड, काजळेश्वर येथून संशयित फैजानउद्दीन ऊर्फ राज फैजानउद्दीन (२७) यास शिताफीने ताब्यात घेऊन कार हस्तगत केली.

दुसऱ्या घटनेत २५ मार्चला सामनगाव येथील बांधकाम साइटवरून ४५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले. गोपनीय माहितीनुसार सदर साहित्य हे रिक्षातून चोरी झाल्याचे समजले. रिक्षाचा शोध घेतला असता, गोरेवाडी, शास्त्रीनगर येथील विक्रांत सुनील हांडोरे (२२) यास ताब्यात घेऊन रिक्षा व साहित्य हस्तगत केले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक देविदास वांजळे, निरीक्षक पवन चौधरी, जयेश गांगुर्डे, राजू पाचोरकर, विलास गांगुर्डे, अनिल शिंदे, वसंत काकड, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, विजय टेमगर, सचिन गावले, मनोहर शिंदे, राकेश बोडके, केतन कोकाटे, महिंद्र जाधव, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख, सागर आडणे, सोमनाथ जाधव, सागर पांढरे, योगेश रानडे यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

ग्लोबल स्टार राम चरण याच्या हस्ते आर्चरी प्रीमियर लीगचा दणदणीत शुभारंभ

Hill Station Travel Tips: पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाताय? मग ट्रॅव्हल बॅगमध्ये नक्की पॅक करा 'या' महत्वाच्या वस्तू

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मनमाड मधील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण

Jalgaon News : रेमंड चौकात मृत्यूशी झुंज! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला लोकांनी डावलले; 'खाकी' वर्दीतील देवदूतांनी वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT