court order esakal
नाशिक

Nashik Crime News : मोपेड चोरट्यांना 2 महिन्याचा कारावास

नरेश हाळणोर

नाशिक : निमाणी बसस्थानकासमोरून मोपेड चोरून नेल्याप्रकरणी दोघा चोरट्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास व २०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. (2 months imprisonment for moped thieves Nashik Crime News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दीपक अर्जून पैठणे (३१, रा. जनता विद्यालयाच्या मागे, लहवित), धनंजय विजय पाटील (३०, रा. इटाणेगाव, ता. साक्री, जि. धुळे) असे दोघा आरोपींची नावे आहेत. शिवाजी दिगंबर गंभीरे (रा. पत्रवाडी, धात्रक फाटा, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, निमाणी बसस्थानकासमोरील आयुष हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दोघा आरोपींनी गेल्या १ नोव्हेंबर २०२२ रोजी मॅस्ट्रो मोपेड दुचाकी (एमएच १५ इसी ९५५४) चोरून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल होता. सदरील गुन्ह्याचा तपास हवालदार अनिल सोर यांनी केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदरचा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे जी.आर. बोरसे यांनी कामकाज पाहिले. आरोपीविरोधातील सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने दोघा आरोपींना दोन महिने साधा कारावास व प्रत्येकी दोनशे रुपये दंड , दंड न भरल्यास पंधरा दिवसांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून व्ही. ए. नागरे, महिला पोलीस कर्मचारी पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT