Corona latest update  esakal
नाशिक

Nashik Corona Update: शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे 2 रुग्ण; आरोग्य विभागाचे सतर्क राहण्याचे आवाहन

दोन्ही रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुक्यात दोन कोरोना रुग्ण सापडले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सिन्नर शहरातील एक साठ वर्षीय वृद्ध तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील येथील 36 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दोन्ही रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. (2 patients of Corona in rural areas including city Health Department calls for vigilance Nashik news)

सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा शिरकाव

सिन्नर शहरात कानडी मळा परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सिन्नर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ही तपासणी करण्यात आली होती.

हा रुग्ण मूळचा घोटेवाडी येथील आसून सध्या सिन्नर शहरात वास्तव्यास आहे. तर दुसरा रुग्ण सुरेगाव येथील आहे. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात केलेल्या तपासणीत या रुग्णास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

या रुग्णांची लक्षणे सर्वसाधारण असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. खबरदारी म्हणून या दोन्ही रुग्णांना क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.

सध्या संपूर्ण तालुक्यात सर्दी खोकल्याची साथ असून नागरिकांनी तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT