2 youths on two-wheeler dead in accident with four wheeler nashik news esakal
नाशिक

Nashik Accident News : चारचाकीच्या धडकेत 2 दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : नाशिक - वणी रस्त्यावरल अक्राळे फाट्यानजिक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीस पाठीमागून उडविल्याने दुचाकीवरील पिंपळनेर येथील दोघा तरुणांचा भाऊबीजेला दुर्दैवी मृत्यु झाला. (2 youths on two-wheeler dead in accident with four wheeler nashik news)

रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक - वणी - कळवण रस्त्यावर अक्राळे फाट्यानजीक दिंडोरी बाजूकडून पिंपळनेर येथे बजाज पल्सर एम एच 15 ईयु 6547 या दुचाकीस पाठीमागून भरधाव वेगाने येणारी इकोस्पोर्ट वाहन क्रमांक एम एच 15 CD 6547 या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील तुषार भाऊसाहेब खांदवे (वय 20) व राहुल लक्ष्मण खांदवे (वय 30 रा. पिंपळनारे, ता. दिंडोरी) हे दोघही युवक गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला.

घटनेचे वृत्त कळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.

ऐन भाऊबीज व दिवाळीच्या दिवशीच दोघा तरुणांवर काळाने घाला घातल्याने पिंपळनेर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण पिंपळनेर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांत चारचाकी वाहनचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT