Death esakal
नाशिक

Nashik News : पैशांसाठी तगादा लावल्याने 24 वर्षीय युवकाने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा

देवळा : हातउसनवारीने घेतलेले पैसे परत करावेत असा तगादा लावल्याने येथील एका चोवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयित दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हर्षल संजय गायकवाड (वय २४) रा.विद्यानगर, देवळा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संजय हरी गायकवाड राहणार विद्यानगर, देवळा यांनी संशयित आरोपी प्रवीण सदाशिव आहेर रा.तीसगाव, ता. देवळा व अमोल निकम रा.दाभाडी ता.मालेगांव यांचेकडून २१ लाख रुपये हातउसनवार घेतले आहेत. त्यापोटी फिर्यादी यांनी वरील दोघांना तीन धनादेश दिले होते. मात्र खात्यावर पैसे नसल्याने हे धनादेश वटले नाहीत.

यामुळे या दोघांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवर वारंवार धमकी देत पैशांचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवार ( ता.११) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. देवळा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत. संजय गायकवाड यांना हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

IND vs WI: भारताविरुद्धच्या T20-वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; धाकड खेळाडूची झाली दमदार वापसी, पहा संपूर्ण संघ

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज! मध्य रेल्वेसह हार्बरवर २२ विशेष लोकलची घोषणा; कधी कोणती धावणार?

बोलता-बोलता सलमान खानच्या छातीत उठल्या तीव्र कळा ; पाणी मागितलं, डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं, बिग बॉसच्या घरातील Viral Video

Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; 500 मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...

SCROLL FOR NEXT