A view on the work of Vanrai Dam.
A view on the work of Vanrai Dam. esakal
नाशिक

Nashik : नांदगाव तालुक्यात 290 वनराई बंधारे; शेकडो हेक्टर शेती येणार ओलिताखाली!

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : पाऊस होतो. मात्र मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तालुक्याच्या कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी २९० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यात ५० बंधाऱ्याच्या कामांना मुहूर्तही लागला आहे. (290 Vanrai Dams in Nandgaon Taluka 100 of hectares of agriculture under irrigation Nashik Latest Marathi News)

वनराई बंधाऱ्यामुळे संबंधितांच्या लाभक्षेत्राला सिंचना सोबतच जनावरांना पिण्यासाठी पाणी नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे. खरीप हंगामात यंदा तालुक्यात साडेसातशे मिलिमीटर पर्जन्यमान झाले. याशिवाय परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणचे नाले अजूनही शिवारातून वाहत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे उन्हाळी लागवडीतही वाढ होईल, याचा अंदाज रोपवाटिकेच्या क्षेत्रातील वाढीवरून येत आहे.

विहिरीतील पाणी पातळी वाढावी. ओढ्या नाल्यांचे वाहून जाणारे पाणी अडविले जावे आणि अडवलेले पाणीत जमिनीत मुरावे, यासाठी कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या नांदगाव, मनमाड व न्यायडोंगरी या तिन्ही मंडलात २९० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

त्याचा प्रारंभ बुधवारी (ता. २) मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांच्या उपस्थितीत गंगाधरी येथे रुईच्या गणपती जवळील नाल्यावर वनराई बंधारा बांधून करण्यात आला. गंगाधरीचे सरपंच सुनील खैरनार, शेतकरी सुभाष जाधव, श्री. भागवत व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून वनराई बंधारा बांधण्यासाठी पुढाकार घेतला.

याचप्रमाणे तळवाडे येथे पाचगणातील नाल्यावर वनराई बंधारा बांधण्याचे शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले. नारायणगाव माळेगाव-कर येथेही वनराई बंधारा बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

आपल्या शेताजवळील नाल्यावर स्वतः पुढाकार घेऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधून आपल्या शिवारातील पाणी अडविण्याचे उजल साक्षरतेचे काम कृषी विभागाबरोबर सर्वांनी करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.

बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना लाभ

वनराई बंधारा जमीन तळापासून ४ ते ५ फूट व नाल्याच्या रुंदीनुसार १० ते १५ फूट लांब बांधावा. त्यासाठी तीन थरांमध्ये ८० ते १०० गोणीची आवश्यकता असते. वनराई बंधाराऱ्यास बांध केल्यास एक वनराई बंधाऱ्याद्वारे ०.२० हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. अशा वनराई बंधाराऱ्याच्या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सिमेंट व खतांच्या रिकाम्या गोणी, माती व वाळूचा वापर करून पाण्याचा प्रवाह अडविण्यात येतो. त्यामुळे बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT