Saptashrungi Devi Wani gad esakal
नाशिक

Saptashrungi Gad : सप्तशृंगगडावर निवाराशेडसाठी 3 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पर्यटनविकास (Nashik News) कार्यक्रमांतर्गत तीन कोटी २२ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. (3 crore sanctioned for shelter shed at Saptshringigarh nashik news)

यात शिवालय परिसरात भाविकांसाठी निवारा शेड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

सप्तशृंगी देवीच्या गडाला शासनाने ‘ब’ दर्जाचे देवस्थान व पर्यटनस्थळ घोषित केल्यापासून राजेश गवळी यांनी पालकमंत्री दादा भुसे, आमदार नितीन पवार यांच्याकडे गड ग्रामपंचायत मार्फत विकासाचा कृती आराखडा सादर केला होता.

तसेच, ही विकास कामे करण्यासाठी वनविभागाकडेही दहा एकर जागेची मागणी केली होती. वनविभागाने सप्तशृंगगडावरील अडचण ओळखून वनविभागानेही जागेला तत्काळ मंजुरी दिली होती. जागा उपलब्ध झाल्याने येथील विकासकामांसाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यानुसार आता सप्तशृंगगडावरील शिवालय परिसरात देवी भक्तांसाठी निवाराशेड बांधकामासाठी तीन कोटी २२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या शेडचे काम होऊन भाविकांना या सेवेचा लाभ होणार आहे.

"कळवण तालुक्यातील विकासकामांसाठी सर्वच विभागांकडे पाठपुरावा सुरु आहे. निधीही मिळत आहे. यात उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान आई सप्तशृंगी देवीच्या गडावर विकास कामे होण्यासाठी विशेष पाठपुरावा सुरु आहे. येथील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही."- नितीन पवार, आमदार, कळवण

"गडावर ग्रामपंचायतीची हक्काची जागा नसल्याने विकास कामे करण्यासाठी अनेक अडचणी येतात. वनविभागाने जागा उपलब्ध करून दिली आहे. आता पर्यटन विकासाचा निधीही मिळत आहे. लवकरच ही विकास कामे होऊन भाविकांची गैरसोय दूर होणार आहे." -राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT