dr Bharti Pawar esakal
नाशिक

Bharati Pawar : जिल्ह्यात नव्याने होणार 3 आरोग्य उपकेंद्र!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील आरोग्य (Health) व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये २५ आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (3 new health centers will be established in district Union Minister of State Dr Bharati Pawar follow up success nashik news)

यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण आणि दिंडोरी तालुक्यात प्रत्येकी एक उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रांचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी सादर करत त्यांचा केंद्रस्तरावर पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यापार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणजे ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र तयार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र यासाठी निधी मिळावा यासाठी निधीची मागणी केली होती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाकडून केंद्राकडे प्रस्ताव दाखल झाले होते. यात राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये २५ आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. याबाबतचा प्रशासकीय मान्यता आदेश नुकताच राष्ट्रीय अभियानचे आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्या आहेत. या उपकेंद्रासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत असलेल्या लेखाशिर्षामध्ये १३ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे.

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये हे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. त्यामध्ये नाशिकचा समावेश असून जिल्ह्यातील चांदवड, कळवण आणि दिंडोरी तालुक्यात प्रत्येकी एक उपकेंद्र उभारले जाणार आहे. यासाठीचा खर्च हा पंधराव्या वित्त आयोगातून भागविण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

राज्यातील १५ जिल्ह्यात २५ केंद्र

नाशिक, नंदुरबार आणि यवतमाळ प्रत्येकी ३, सातारा, अहमदनगर, अकोला आणि वाशीम प्रत्येकी २, तर रायगड, रत्नागिरी, पुणे, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूर प्रत्येकी एक अशा २५ उपकेंद्रांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT