Fire broke out at shops in Chowk Mandai area. esakal
नाशिक

Nashik Fire Accident: आगीत चौक मंडईतील 3 दुकाने खाक! 35 ते 40 लाखाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : चौक मंडई भागातील तीन दुकानांना आग लागून सुमारे ३५ ते ४० लाखाचे नुकसान झाले.

सोमवार (ता. ९) रात्री साडेअकराच्या सुमारास घटना घडली. सुदैवाने जीवितहानी घडली नाही, एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

जहाँगीर मशीद भागातील शॉपिंग सेंटरमधील धार्मिक पुस्तके आणि वस्तू, ब्रँडेड परफ्युम विक्री करणाऱ्या तीन दुकानांना आग लागली. (3 shops in Chowk Market destroyed in fire 35 to 40 lakhs loss nashik)

रात्री साडेअकराच्या सुमारास केजीएन बुक डेपोमधून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी अग्निशामक विभागास माहिती दिली. अवघ्या काही वेळेतच बंब दाखल होण्यापूर्वी आगीने रौद्ररूप धारण केले.

शेजारील कलीम रजा आणि मिर्झा बुक डेपो आगीच्या कचाट्यात सापडले. दरम्यान, आगीचे लोळ उंच उठल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अग्निशामक बंब दाखल होण्यापूर्वी तरुणांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

अग्निशामक मुख्यालय आणि पंचवटी अशा दोन्ही केंद्रावरून सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बंबाच्या साहाय्याने सुमारे दोन ते अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवले. तरुणांनी दुकानांची जाळी तोडून काही साहित्य वाचविण्याचा प्रयत्न केला.

त्यात एक जण किरकोळ जखमी झाला. आगीची तीव्रता अधिक असल्याने केजीएन पूर्णपणे, तर कलीम रजा आणि मिर्झा बुक डेपो काही प्रमाणात जळून राख झाले.

आगीत सुमारे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले. दरम्यान दुकानांच्या वरच्या भागात असलेल्या शाळेच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झाले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुकानांमध्ये धार्मिक पुस्तके, वस्तू, भेटवस्तू, अत्तर, लाकडी फर्निचर, टोपी, ब्रँडेड परफ्युम, सीसीटीव्ही, फॅन अशा वस्तू असल्याने आगीने क्षणात पेड घेतला.

वेळीच दखल घेतली असती तर...

आग लागलेल्या दुकानावरील मजल्यावर खासगी प्राथमिक शाळा भरते. शाळेच्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पोचले होते. त्यामुळे शाळेच्या खिडक्यांचा काचा फुटल्या होत्या. रात्री घटना घडल्याने शाळा बंद होती.

दिवसा घटना घडली असती. तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने तसे झाले नसल्याने विद्यार्थी बचावले. अनेक दिवसांपासून वीज वितरण विभागाकडून पुरवठा होणाऱ्या विजेचे अचानक कमी जास्त होण्याचे प्रमाण घडत होते.

वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, स्पार्क होणे असे प्रकार घडत होते. याबाबत दोन दिवसांपूर्वीच दुकानदारांनी वीज वितरण विभागास तक्रार केली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्याने घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

"शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेता दोन दिवसापूर्वी वीज वितरण विभागात तक्रार करण्यात आली होती. वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर घटना टळली असती."- वसीम अत्तार, दुकानदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT