3 thousand 622 candidates were absent for the set exam nashik marathi news 
नाशिक

नाशिकमध्ये सेट परीक्षेला ३ हजार ६२२ परीक्षार्थ्यांची दांडी

अरुण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा येथे सेट परीक्षेचे संयोजन केले जाते. प्रारंभी जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार २८ जूनला सेट परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा वेळापत्रकानुसार होऊ शकली नव्‍हती. अखेर रविवारी (ता.२७) ही परीक्षा घेण्यात आली. 

अठरा केंद्रांवर ४ हजार ९४६ उमेदवारांची हजेरी

अधिव्‍याख्यातापदासाठी रविवारी (ता.२७) झालेल्‍या राज्‍य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेसाठी ८ हजार ५६८ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी तब्‍बल ३ हजार ६२२ परीक्षार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. तर ४ हजार ९४६ उमेदवार या परीक्षेला सामोरे गेले. दरम्‍यान विशेष विषयाशी निगडीत असलेल्‍या पेपर क्रमांक दोनने चांगलाच घाम फोडल्‍याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिली. 

पेपर दोनने फोडला घाम 

परीक्षेत समान्‍यज्ञान व अन्‍य मुद्यांवर आधारीत पेपर क्रमांक एक हा सर्व परीक्षार्थ्यांसाठी सारखाच होता. शंभर गुणांकरीता पन्नास बहुपर्यायी वस्‍तुनिष्ठ प्रश्‍न या पेपरमध्ये विचारले गेले. यंदा हा पेपर सोपा गेल्‍याचे बहुतांश उमेदवारांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांच्‍या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमावर आधारीत असलेला पेपर क्रमांक दोन हा तुलनेने कठीण गेल्‍याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिली. या पेपरमध्ये दोनशे गुणांसाठी शंभर बहुपर्यायी वस्‍तुनिष्ठ प्रश्‍न विचारले गेले. दरम्‍यान कोरोनाच्‍या पार्श्वभुमिवर उमेदवारांना मास्‍क सक्‍तीचे केले होते. तर पाण्याची बाटली, सॅनिटायझन आणि पेन उमेदवारांनी स्‍वतःसोबत आणले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT