Godavari  esakal
नाशिक

Sewage Survey : ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे 30 टक्के सर्वेक्षण पुर्ण; आयुक्त पुलकुंडवार

सकाळ वृत्तसेवा

Sewage Survey : आगामी सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर गोदावरी व उपनद्या प्रदुषण मुक्त करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या नमामि गोदा प्रकल्पांतर्गत मलजल वाहिन्यांचे तीस टक्के सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून, येत्या ऑगष्ट अखेरपर्यंत सल्लागार संस्थेतर्फे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. (30 percent survey of Namami Goda project completed nmc Commissioner Pulkundwar nashik news)

गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत नमामि गोदा प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली. गोदावरी प्रदूषण मुक्तीसंदर्भात महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी या बैठकीत दिली.

तपोवन, आगरटाकळी, चेहडी, पंचक या चार मलशुद्धीकरण केंद्रांचे अद्ययावतीकरण व क्षमतावाढीच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय नदी संवर्धन विभाग (एनआरसीडी) कडे सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

एनआरसीडीमार्फत हा प्रकल्प छाननीसाठी आयआयटी रूरकी यांच्याकडे पाठविण्यात आ ला आहे. तपोवन आणि आगरटाकळी या दोन मलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे.

केंद्राच्या अमृत २.० योजनेतही ते प्रस्तावित केले आहेत. तसेच, मखमलाबाद, कामटवाडा येथे दोन नवीन मलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याचे चव्हाणके यांनी या वेळी सांगितले. ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीने मलजल वाहिनीचे सर्वेक्षण ३० टक्के पूर्ण केले आहे. जीआयएस मॅपिंगचे काम सुरु असल्याची माहीती चव्हाणके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT