haranbari right canal esakal
नाशिक

Nashik News : हरणबारी उजव्या कालव्यासाठी 33. 50 कोटी मंजूर! शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता

डॉ. भामरे म्हणाले, बागलाण तालुक्यातील करंजाडी खोरे ते मालेगाव तालुक्यातील सातमाने दूंधे तळवाडेपर्यंतच्या दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचा पाण्यासाठी टॅंकरचा वापर करावा लागत होता.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : बागलाण व मालेगाव तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या व गेल्या २५ वर्षापासून मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या हरणबारी उजवा कालव्याच्या कामासाठी शासनाने ३३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली. (33 half crore approved for Haranbari right canal Final Administrative Approval of Govt Nashik News)

डॉ. भामरे म्हणाले, बागलाण तालुक्यातील करंजाडी खोरे ते मालेगाव तालुक्यातील सातमाने दूंधे तळवाडेपर्यंतच्या दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचा पाण्यासाठी टॅंकरचा वापर करावा लागत होता.

या गावांसाठी हरणबारी उजवा कालवा व्हावा व धरणाचे पाणी दुष्काळी गावागावात पोचावे अशी अपेक्षा शेतकरी बांधवांची होती. आता हरणबारी उजवा कालव्यासाठी पाणी आरक्षित करून घेतले असून कालव्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतर हा कालवा बंदिस्त स्वरूपाचा व्हावा, त्याच्यामुळे जमीन अधिग्रहण व शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक गावाला हे पाणी पोहचेल असे प्रयोजन केले.

कालवा बंदिस्त केल्याचे ठरविल्यानंतर तापी महामंडळ जळगाव यांनी या कालव्याची जलवाहिनीचा आराखडा बदलला. त्याला मेरीने मंजुरी दिली.

या कालव्याला मागील ७- ८ महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून मंजुरी मिळाली, त्यानंतर या कालव्याला निधी उपलब्ध झाला व आज १३ फेब्रुवारीस अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली.

बागलाण व मालेगाव तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हरणबारी उजव्या कालव्यातील लाभ क्षेत्रातील येणाऱ्या खालील गावांना सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा फायदा होणार आहे.

या गावांना होणार फायदा

पारनेर, निताने, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, कोटबेल, कोळीपाडा, आसखेडा, द्याने, खिरमाणी, फोपीर, नामपूर, कुपखेडा, नळकस, सारदे, काकडगाव, अंबासन, रातीर, रामतीर, सुराणे, देवळाणे, दुंधे- तळवाडे, वायगाव, सतमाने तसेच केळझर वाढीव चारी क्रमांक आठला देखील महाराष्ट्र नियामक मंडळाने मंजुरी दिलेली आहे. बागलाण तालुक्यात या कालव्याच्या अंतिम प्रशासकीय मंजुरीमुळे आनंदाचे वातावरण आहे.

"बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा मंजूर करणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. परंतु जनतेने दिलेला आशिर्वाद व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्यामुळे हे अशक्यप्राय काम मी पूर्ण करू शकलो. त्यामुळे दुष्काळाग्रस्त गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे."- डॉ. सुभाष भामरे, खासदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT