malegaon esakal
नाशिक

मालेगाव शहरातील गटार, नाल्यांवरील 350 अतिक्रमणांवर हातोडा

बहुसंख्य भागात गटारीवर स्लॅब टाकल्याने गटार बंद झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील अतिक्रमण निर्मुलन मोहिम पाचव्या दिवशीही सुरुच होती. प्रभाग समिती कार्यालय एक मधील शीतला माता नगर येथील नाल्यावरील, तर प्रभाग दोनमधील मिलन हॉटेल ते करीम नाकापर्यंत नाल्यावरील, तसेच, प्रभाग चारमधील सुलेमानी चौक, जामेयत स्वालेहात ते जुना आझाद नगर पोलीस चौकीपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आली.

प्रामुख्याने या भागातील रस्त्यास अडथळा निर्माण करणारी व गटारीवर स्लॅब, पत्रे, बल्ली, मोरी बांधकाम आदींचे अतिक्रमण काढून गटार मोकळी करण्यात आली. तीनही प्रभागात सुमारे ३५३ अतिक्रमण काढण्यात आले. बहुसंख्य भागात गटारीवर स्लॅब टाकल्याने गटार बंद झाली होती. कारवाईत गटारी व नाले मोकळे करण्यात आले. काही अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले.

आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, शाम बुरकुल, अब्दुल कदिर अब्दुल लतीफ, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे, वरिष्ठ लिपिक सुनील खैरनार, लिपिक विनय शिंदे, शिपाई शैलेश सोळंकी, सर्व प्रभागांचे बिट मुकादम व अतिक्रमण गस्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT