graps.png 
नाशिक

जर्मनीसह युरोपमध्ये द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा डंका!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जर्मनीमधील पाच टनांच्या एका "लॉट'मधील एका नमुन्यात आढळलेल्या उर्वरित अंशाचा (रेसिड्यू) "बाऊ' करण्याचे कारण नाही. हा प्रश्‍न एका "लॉट'पुरता सीमित असून, रसाळ गोमट्या द्राक्षांची जर्मनीसह युरोपमध्ये निर्यात सुरळीत असल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी म्हटले आहे. आतापर्यंत 36 हजार 429 टन द्राक्षांची निर्यात झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

द्राक्षांचा हंगाम टिपेला पोचलेला असतांना चुका होणार नाहीत याची काळजी घेण्याची आवश्‍यकता

द्राक्षांच्या निर्यातीसाठी "ग्रेपनेट' प्रणाली यशस्वी झाली असून, यंदाच्या हंगामासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील द्राक्ष उत्पादकांनी 33 हजार 505 बागांची प्रणालीत नोंदणी केली. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण द्राक्षांचे उत्पादन करण्याची खबरदारी घेतलेली आहे. त्यातून जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांबद्दलची विश्‍वासार्हता वृद्धिंगत झाली आहे, असे श्री. भोसले यांनी सांगितले. त्याचबरोबर द्राक्षांचा हंगाम टिपेला पोचलेला असतांना चुका होणार नाहीत याची काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी म्हटले आहे. 

निर्यातीत नाशिकची आघाडी 

नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक 33 हजार 795, त्या खालोखाल सांगलीतून एक हजार 807, साताऱ्यामधून 606, नगरमधून 94 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष उत्पादकांच्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या हंगामात आणखी 60 ते 70 टक्के द्राक्षे बाजारात येतील. सद्यःस्थितीत "व्हाइट व्हरायटी'ला निर्यातीसाठी 80 ते 105 आणि रंगीत वाणासाठी 120 ते 125 रुपये असा भाव मिळत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत लांब मण्यांची द्राक्षे 50 ते 65 आणि गोल मण्यांची द्राक्षे 30 ते 35 रुपये किलो भावाने विकली जात आहेत. 

नोंदणीमध्ये महाराष्ट्र अव्वल
 
निर्यातक्षम द्राक्षांच्या बागांची "ग्रेपनेट' प्रणालीत नोंदणी करण्यात महाराष्ट्रातील शेतकरी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील 24 हजार 474 बागांची पुनर्नोंदणी केली असून, नव्याने आठ हजार 908 बागांची नोंदणी झाली आहे. कर्नाटकच्या 115, तर आंध्र प्रदेशातील आठ बागांची नोंदणी झाली. प्रणालीत नोंदणी झालेल्या जिल्हानिहाय बागांची संख्या अशी :  नाशिक- 28 हजार 609, नगर- 426, लातूर- 120, उस्मानाबाद- 253, पुणे- एक हजार 141, सांगली- दोन हजार 124, सातारा- 432, सोलापूर- 271. 


द्राक्षांची निर्यात (आकडे टनामध्ये) 

नेदरलॅंड ----- 24 हजार 382 
जर्मनी -----  4 हजार 479 
इंग्लंड -----  3 हजार 953 
डेन्मार्क ----- 866 
(फिनलॅंड, आयर्लंड, स्पेन, पोतुर्गाल, ऑस्ट्रिया, स्वीडन, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, नॉर्वे आदी देशांमध्येही निर्यात झाली.) (गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्या पर्यंत 44 हजार 891 टन द्राक्षांची निर्यात झाली होती.) 

जर्मनीमध्ये पाच टनांच्या एका "लॉट'मध्ये उर्वरित अंश आढळल्याच्या घटनेने शेतकऱ्यांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही. भारतीय द्राक्षांबद्दल जगाच्या बाजारपेठेत कुठेही शंका घेतली जात नाही. उलटपक्षी उत्तम दर्जाची द्राक्षे आपल्या योग्य पद्धतीच्या प्रणालीमुळे जगभरातील ग्राहकांना उपलब्ध होताहेत. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री ऍग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी 

भारतीय द्राक्षांच्या निर्यातीमध्ये कसल्याही प्रकारचा गुंता नाही. निसर्गाच्या बिघडलेल्या वेळापत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे स्थानिक आणि जगाच्या बाजारपेठेत त्यास चांगला भाव मिळत आहे. - कैलास भोसले, खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT