Tehsildar Abhijit Barwakar handing over the aid check to farmer Shankar Nisarad. Neighbors Sindhubai Nisarad, Atmaram Fokane, Police Patil Kailas Fokane etc.
Tehsildar Abhijit Barwakar handing over the aid check to farmer Shankar Nisarad. Neighbors Sindhubai Nisarad, Atmaram Fokane, Police Patil Kailas Fokane etc. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला 37 हजार 500 भरपाई; तहसीलदार बारवकर यांची तत्परता

विजय पगारे

इगतपुरी : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटी खुर्द येथील शंकरत निसरड यांचे घर कोसळले होते. त्यात संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि एका म्हशीचा मृत्यू झाला होता.

तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तलाठी, मंडलाधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. (37 thousand 500 compensation to unseasonal rain farmer Tehsildar Barwakar promptness nashik)

त्यानुसार शंकर यशवंत निसरड यांना ३७ हजार ५०० रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश प्रदान देण्यात आला. तहसीलदार अभिजित बारवकर, मंडलाधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी मनोज मोरे यांनी घोटी खुर्द येथील राहत्या घरी जाऊन दिला.

आत्माराम फोकणे यांनी घटना घडल्यापासून मदत मिळेपर्यंत यशस्वी पाठपुरावा केला. पीडित शेतकरी शंकर निसरड यांनी महसूल अधिकारी आणि आत्माराम फोकणे यांचे आभार मानले.

पीडित शेतकरी शंकर यशवंत निसरड यांची पत्नी सिंधूबाई निसरड, आत्माराम फोकणे, घोटी खुर्दचे पोलिसपाटील कैलास फोकणे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, रामचंद्र रोंगटे, उद्धव रोंगटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT