3900 employees of district will be given pension today nashik news esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील 3900 कर्मचाऱ्यांना आज निवृत्तिवितेन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेत निवृत्तिवेतन मिळावे, यासाठी मंत्रालय स्तरावर धोरणात्मक निर्णय झालेला असताना नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तीन हजार ९०० निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन १ तारखेला बँक खात्यावर जमा केले आहे. (3900 employees of district will be given pension today nashik news)

जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पेन्शन देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने केला. त्यादृष्टीने शनिवार व रविवारी काम करत जिल्ह्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली.

विशेष म्हणजे या तीन हजार ९०० कर्मचाऱ्यांसाठी लागणारे १६ कोटी रुपये राज्य सरकारने २८ जुलैला पाठवले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाची मागणी वेळेत सादर करण्यात आली.

प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्याशी संवाद साधत बिले सादर झाल्याची खात्री उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी करून घेतली. निवृत्त कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण होत असल्याचे समाधान निवृत्तिवेतनधारकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT