Fire Accident esakal
नाशिक

Nashik News : स्वयंपाक गॅसच्या स्फोटात 4 जखमी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : जेलरोड परिसरातील नारायण बापू चौक जवळ विठ्ठल मंगल कार्यालयासमोर स्वयंपाक गॅसचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यात एक महिला व तीन मुले जखमी झाले आहे. (4 injured in cooking gas explosion Nashik News )

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

पूजा लोखंडे यांचे भाडोत्री रोशनी सोलंकी यांच्या घरात गॅसचा स्फोट झाला. सकाळी स्वयंपाक करत असताना हा स्फोट झाल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी दिली. जखमींना उपचारासाठी नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले.

त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटामध्ये रोशनी सोलंकी व तिचे तीन मुले प्रज्ज्वल, छकुली, आर्यन, जखमी झाले.

अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी सुभाष निकम, शांताराम गायकवाड, रामदास काळे, मनोज साळवे, श्रीकांत नागपुरे, अशोक मिलमणी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत घराचे छतावरील पत्रे उडाले व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT