Nashik corona update Corona
नाशिक

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्‍तांची संख्या चार लाखांच्‍या घरात

अरूण मलाणी

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरु आहे. बुधवारी (ता.६) जिल्‍ह्‍यात ९६ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ९२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ९०४ बाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्‍यान आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ८ हजार ९५२ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी तीन लाख ९९ हजार ४०६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. यातून कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या चार लाखांच्‍या घरात पोहचली आहे.

प्रलंबित अहवालांची संख्या वाढली

बुधवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या साठ राहिली. नाशिक महापालिका क्षेत्रात ३५, तर जिल्ह्याबाहेरील एका बाधिताला कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, मृत हा नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे.
प्रलंबित अहवालांची संख्या वाढलेली असून, सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ७०४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील दोन हजार ३२६ तर मालेगावच्‍या २०७, नाशिक शहरातील १७१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६५५ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ६३९ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा रुग्‍ण दिवसभरात दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील दहा रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

Milk Adulteration : दूध भेसळ प्रकरण भरकटविण्याचा डाव; देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप समर्थकांनी फेटाळले

Latest Marathi News Live Update : दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू

LPG New Rule: गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची डेडलाईन! eKYC न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर परिणाम; घरबसल्या eKYC कशी कराल?

Vasai Virar Protest : हक्काच्या जागा, ओळखपत्रांसाठी फेरीवाल्यांचा वसई-विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT