NMC Latest News esakal
नाशिक

NMC Advertisement License Fee : जाहिरात परवाना शुल्कात 4 पटींनी वाढ!

विक्रांत मते

नाशिक : शहराच्या विविध भागांमध्ये लावले जाणारे होर्डिंग, भित्तिचित्रे, डिजिटल बोर्ड व कमानीवरील जाहिरातींच्या परवाना शुल्कात चार पटींनी वाढ करण्याचा निर्णय सोमवारी (ता. १४) घेण्यात आला. त्याचबरोबर आता नियमितपणे दर तीन वर्षांनी जाहिरात परवाना दरात १५ टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. (4 times increase in advertisement license fee by NMC Nashik News)

जाहिरातीसाठी महापालिकेकडून परवाना दिला जातो. प्रतिचौरस फूट २० रुपये याप्रमाणे दरवर्षी जाहिरात परवान्याकरिता कर आकारला जातो. मे २००८ ला स्थायी समितीने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आत्तापर्यंत याच दराने कराची आकारणी होत आहे. १४ वर्षांपासून जाहिरात परवाना शुल्कात वाढ करण्यात आलेली नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधले जात आहे. थकबाकी वसूल करणे, मालमत्ता करात वाढ, त्याचबरोबर आता जाहिरात परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या महासभेत जाहिरात परवाना शुल्क दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या १२९ ठिकाणांवर जाहिरात फलक उभारताना प्रतिवर्षी वीस रुपये प्रतिचौरस फूट दर आकारला जात आहे. आता हाच दर सात रुपये प्रतिचौरस फूट मात्र मासिक दर आकारण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील इतर खासगी जागांवर आकाशचिन्ह, जाहिरात फलकांकरिता साडेपाच रुपये प्रतिचौरस फूट प्रतिमासिक दर आकारला जाणार आहे.

वाहनेदेखील कराच्या जाळ्यात

विशिष्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने हवेत फुगे सोडले जातात. त्याचबरोबर रोडशो आधीच्या माध्यमातूनदेखील जाहिरात केली जाते. सध्या बांधकामांचे प्रोजेक्टची जाहिरातदेखील सायकल तसेच घोडा व बैल आधीच्या माध्यमातून होते. प्राण्यांच्या माध्यमातून ओढल्या जाणाऱ्या वाहनांवर सायकलीवरदेखील जाहिरात होते. जाहिरात होणाऱ्या अशा प्रकारच्या प्रत्येक व्यवस्थेवर आता जाहिरात परवाना शुल्क आकारला जाणार आहे.

पाच फुटाच्या आतील ध्वजासाठी आता १२ रुपये प्रतिदिन दर आकारला जाणार आहे. यात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली. हवेत सोडलेल्या फुग्याच्या माध्यमातून प्रतिचौरस फूट प्रतिदिन १५ रुपये, तर तात्पुरत्या कमानींवर पंधरा रुपयांऐवजी २० रुपये प्रतिचौरस मीटर प्रतिदिन दर आकारला जाणार आहे. प्रकाशयोजना नसलेल्या वाहनांवर जाहिरातींवर साडेपाच रुपये, तर प्रकाशयोजना असलेल्या जाहिरातींसाठी साडेसहा रुपये प्रतिचौरस फूट प्रतिदिन असा दर आहे.

प्राण्यांच्या वाहनांवर साडेचार रुपये प्रतिचौरस फूट प्रतिदिन असा जाहिरात परवाना शुल्क लागू करण्यात आला आहे. या माध्यमातून महापालिकेला वर्षाला दहा कोटी रुपये महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान जाहिरात परवाना शुल्कात वाढ करताना जाहिरात फलक प्रक्रियेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे आहेत जाहिरातीचे दर व अटी

इमारतींच्या सामासिक अंतरात जाहिरात फलक लावण्यास परवानगी नाकारण्यात येणार आहे. होर्डिंग धारकांना आकारात बदल करता येणार नाही. फलकांसाठी तीन वर्षानंतर परवाना नूतनीकरण करावा लागेल. गृह प्रकल्पांच्या जाहिरातींकरता एक वर्षांचा परवाना राहील. महत्त्वाच्या १२९ ठिकाणांवर दहा बाय वीस फूट आकाराच्या जाहिरात फलकासाठी सात रुपये प्रतिचौरस फूट प्रतिमहिना या आधाराप्रमाणे दर आकारला जाईल. यापूर्वी वीस रुपये प्रतिचौरस फूट दर होता, मात्र तो एका वर्षासाठी होता.

आता दर महिन्याला सात रुपये प्रतिचौरस फूट कर अदा करावा लागेल. दहा बाय वीस अकराच्या जाहिरात फलकासाठी १६८०० परवाना शुल्क अदा करावा लागेल. वीस बाय वीसकरिता ३३ हजार ६०० रुपये, ३० बाय १५ चौरस फूट फलकासाठी ३७ हजार ८०० रुपये तर ६० बाय २० आकाराच्या फलकासाठी एक लाख आठशे रुपये एवढा कर अदा करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Manager Cyber Fraud : सायबर ठगांनी स्टेट बँकेच्या मॅनेजरलाच लावला चुना, तब्बल १३ लाख लुटले; पोलिसांत तक्रार दाखल

राज्यभरात थांबवलं 'मनाचे- श्लोक' चित्रपटाचं प्रदर्शन, चित्रपटाचं नाव बदलणार, मृण्मयी पोस्ट शेअर करत म्हणाली...'अतिशय दु:खद'

Pune Weather: पुढील ४८ तासांत पुण्यातून मॉन्सूनची माघार, ५ दिवस उन्हाचा चटका

Premature Baby Miracle: डॉक्टरांच्या सेवेतून उमलली तीन जीवांची नवी पहाट; अवघ्या ५५०, ७४० अन ८०० ग्रॅम वजनाच्या बाळांवर यशस्वी उपचार

Latest Marathi News Live Update : मनाचे श्लोक" चित्रपटावरून काँग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT