घोटेकर परिवाराने लेकीचे उत्साहात स्वागत  esakal
नाशिक

40 वर्षानंतर मुलीच्या जन्माने भारावले घोटेकर कुटुंब

प्रमोद पाटील

चिचोंडी (नाशिक) : घरात चाळीस वर्षानंतर जन्मलेल्या लेकीचं चिचोंडी बुद्रुक (ता.येवला) येथील लेकीचे आजी कमल घोटेकर, आजोबा वारकरी संप्रदायाचे रघुनाथ घोटेकर, वडील विठठल घोटेकर यांनी चाळीस आंब्याचे रोपे देऊन तसेच फुलांच्या पायघड्या, फुलांचे तोरण, नवजात लेकीच्या लक्ष्मीच्या पावलांच्या कुंकवाच्या ठस्यांनी मोठ्या आनंदी वातावरणात स्वागत करत लेकीच्या जन्माचे स्वागत केले.

घरात ४० वर्षानंतर लेकीचा जन्म झाल्याने चाळीस महिलांना आंब्याची वृक्ष देत व फटाके फोडून फुलांच्या सडा-रांगोळी लेकीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले

४० वर्षांनंतर घोटेकर कुटुंबियांच्या घरांमध्ये जिजाऊच्या लेकी चे आगमन झाले असून यानिमित्ताने कुटुंबाने वृक्ष वाटप करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी नकोशी असलेल्या लेकीला गर्भपात करून तिला जगात येण्यापूर्वीच मारले जाते. तर अनेक ठिकाणी मुलींचा जन्म झाला म्हणून नवजात अर्भकाला फेकून दिले जाते मात्र शेतकरी कुटुंबातील रघुनाना घोटेकर यांच्या परिवार अपवाद ठरले आहे. मुलीचे आजोबा रघुनाथ रेवजी घोटेकर यांना दोन्ही मुलच झाली होती. २० वर्षांपूर्वी सर्पदंशाने मोठ्या मुलाचा मृत्यू झाला होता. आपल्याला मुलगी व्हावे अशी त्यांची इच्छा होती मात्र यासाठी त्यांना ४० वर्ष वाट पहावी लागली. रघुनाथ घोटेकर यांचा धाकला मुलगा विठ्ठल याला पहिलेच कन्यारत्न झाले.

हौशी असलेल्या आजोबांची चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर मुलीचे फटाके फोडून जोरदार स्वागत केले. तसेच ४० महिलांना एकत्र बोलावून त्यांना आंब्याची रोपांचे वाटप करून 'पर्यावरण बचाव आणि बेटी बचाव'चा लाखमोलाचा संदेश देखील दिला आहे. यावेळी आई शीतल घोटेकर, राजेंद्र घोटेकर, शिवाजी निमसे, रावसाहेब खराटे, अनिता घोटेकर, ऋतुजा घोटेकर, श्रीराम दाणे, संतोष खकाळे, भानुदास मढवई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. चिचोंडी व परिसरात प्राथमिक शाळा, विद्यालयामधून लेकीच्या जन्मबद्दल जनजागृती केली जाते. या परिसरात लेक वाचवा चे कार्य करणारे ज्ञानेश्वर पायमोडे यांनी केलेली जनजागृती, ग्रामीण भागात लेकीच्या जन्माचे स्वागत, लेकीच्या नावाच्या पाट्या घरांना लावणे हा अश्या कार्याचा मोठा भाग आहे. लेकीच्या जन्माचे स्वागत आता ग्रामीण भागात होत असल्याने ही परिवर्तनाची नांदी आहे.

"आमच्या घोटेकर कुटुंबात तब्बल चाळीस वर्षानंतर मुलीचा जन्म झाला. त्यामुळे आमच्या कुटुंबात मुलीच्या जन्माचे स्वागत मोठे जोरदार पद्धतीने, फटाके फोडून, ४० महिलांना वृक्ष वाटप करून करण्यात आले. ग्रामीण भागात मुलीच्या जन्माबद्दल असलेली नाराजी दूर करण्याचा आम्ही यानिमित्ताने छोटासा प्रयत्न केला."

- रघुनाथ घोटेकर, लेकीचे आजोबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT