corona update
corona update corona update
नाशिक

जिल्‍ह्यात कोरोनाचे आणखी 43 बळी; दिवसभरात 4 हजार 36 पॉझिटिव्‍ह

अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनामुळे कोरोना बळींची संख्या चाळीसहून अधिकच राहत आहेत. शुक्रवारी (ता.7) दिवसभरात 43 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. चार हजार 036 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर तीन हजार 606 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सलग दुसर्यांना वाढ झाली आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत 387 ने वाढ झाली असून सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 34 हजार 553 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी झालेल्या 43 मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सतरा, नाशिक ग्रामीणमधील 21 तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील चार व जिल्‍हा बाहेरील एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला. तर नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 815, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 979, मालेगावचे 68 तर जिल्‍हा बाहेरील 174 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत पाच हजार 572 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी तीन हजार 780 नाशिक ग्रामीणमधील तर नाशिक शहरातील एक हजार 536, मालेगावला 256 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात (Home Quarantine) तीन हजार 908 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी तीन हजार 580 रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चौदा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 258, मालेगावला 54 रुग्‍ण दाखल झाले आहेत.

एकूण कोरोना बाधितांच्‍या संख्येने ओलांडला साडे तीन लाखांचा टप्पा

जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांच्‍या संख्येने साडे तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्‍ह्‍यात तीन लाख 50 हजार 287 बाधित आढळले आहेत. यात नाशिक शहरात सर्वाधिक दोन लाख 6 हजार 347, नाशिक ग्रामीणमध्ये एक लाख 27 हजार 226, मालेगावला अकरा हजार 801, जिल्‍हा बाहेरील चार हजार 913 बाधित आढळले आहेत. दरम्‍यान तीन लाख 11 हजार 950 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात एक लाख 87 हजार 907, नाशिक ग्रामीणमध्ये एक लाख 9 हजार 589, मालेगावला नऊ हजार 968, तर जिल्‍हा बाहेरील चार हजार 486 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT