ZP Teacher Posting esakal
नाशिक

ZP Teacher Posting : विनाशिक्षक शाळांना मिळाले 33 शिक्षक; आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना

सकाळ वृत्तसेवा

ZP Teacher Posting : जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून आलेल्या ४३ शिक्षकांना सोमवारी (ता.१२) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पदस्थापना दिली. यातून एकही शिक्षक नसलेल्या एकूण ३३ शाळांवर शिक्षक देण्यात आले आहे.

यामुळे आता शिक्षकविना असलेल्या ३३ शाळांना शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हयात आता एकही शाळा शिक्षकविना राहिलेली नाही. (43 teachers who came through inter district transfer were posted by education department nashik news)

आंतरजिल्हा बदलीतून ४३ शिक्षक जिल्ह्यात आले आहे. या शिक्षकांना सोमवारी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रभारी शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या उपस्थितीत पदस्थापना देण्यात आली.

नूतन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना या ग्रामीण भागातील बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना किमान एक तरी हक्काचा शिक्षक उपलब्ध असावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांना प्राधान्याने पदस्थापना देण्याचे धोरण स्वीकारत शिक्षकांना पदस्थापना दिली.

जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागासह काही अन्य शाळांमधील शिक्षकांची बदली झाल्यानंतर तिथे एकही शिक्षक नसलेल्या तब्बल ३३ शाळा होत्या. या शाळांमध्ये एकही शिक्षक अध्यापनासाठी नव्हते. या बिनशिक्षकी असलेल्या ३३ शाळांवर ३३ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात कळवण ७, सुरगाणा २, त्र्यंबकेश्वर ३, बागलाण आणि दिंडोरी प्रत्येकी १, चांदवड आणि देवळादेखील प्रत्येकी एक, तर नांदगाव सर्वाधिक ९ शाळांना प्रत्येकी एक शिक्षक देण्यात आला. पेठ तालुक्यात सहा छोट्या शाळांना प्रत्येकी एक याप्रमाणे ६ तर अन्य दोन मोठ्या शाळांना प्रत्येकी दोन शिक्षक देण्यात आल्याने प्रत्येक शाळोत विद्यार्थ्यांना किमान एक शिक्षक उपलब्ध झाले आहेत.

याशिवाय ५ शिक्षकांना उर्दू शाळेत पदस्थापना देण्यात आली आहे. यात येवला येथे ३, नांदगाव व निफाड येथे प्रत्येकी १ शिक्षकांची पदस्थापना देण्यात आली आहे. या पदस्थापनेमुळे आदिवासी भागातून बदलीहून शिक्षकांअभावी कार्यमुक्त न करण्यात आलेल्या सुमारे ७३ शिक्षकांनाही कार्यमुक्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT