शाळा Google
नाशिक

नाशिक : खासगीमधून ४८१ विद्यार्थ्यांचा पालिकेच्या शाळेत प्रवेश

विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे रोजगार हिरावल्याने आर्थिक परिस्थिती खालावलेल्या पालकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. शहरामध्ये ४८१ खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून पालिकेच्या शाळेत प्रवेश झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे.



शहरात महापालिकेच्या ८८ प्राथमिक शाळा आहेत. त्या शाळेत २२ हजार ४७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे, तर तेरा माध्यमिक शाळांमध्ये ३, ५५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडू नये, यासाठी महापालिकेच्या शिक्षकांनीदेखील ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देता आले नाही. पंधरा हजार १४३ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था झाली. आठ हजार ८३८ विद्यार्थ्यांकडे सुविधा नसल्याने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण दिले गेले, तर दोन हजार ४९ विद्यार्थ्यांशी संपर्क होत नसल्याने ते विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेल्याचा निष्कर्ष अहवालातून निघाला होता. परंतु, महापालिका शाळांमध्ये खासगी शाळांमधून प्रवेश घेणाऱ्यांची संख्यादेखील यावर्षात वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.


रोजगार बुडाल्याचा परिणाम

ऑनलाइन शिक्षण असतानाही खासगी शाळांकडून फी वसूल केली जात आहे. परंतु, कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने अनेकांना फी भरणे परवडत नाही. फी अदा न केल्यास ऑनलाइन शिक्षण बंद केले जात असून, विविध कारणे देवून पालक व विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे पाल्यांना खासगी शाळांमधून महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यावर्षात ४८१ खासगी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी महापालिकेच्या शाळेमध्ये दाखल झाले आहेत. खासगी शाळेमध्ये फी सोबतच अन्य कारणांसाठी शुल्क अदा करावे लागतात, परंतु मनपाच्या शाळेत शिक्षणासह साहित्यदेखील मोफत मिळत असल्याने महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी दाखल केले जात आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात ४८१ खासगी शाळांमधील विद्यार्थी दाखल झाले आहेत. शैक्षणिक शुल्क परवडत नसल्याचे कारण प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे.
- सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Pune Nashik Railway Issue : पुणे–मंचर–नाशिक रेल्वे मार्ग रद्द, उत्तर पुणे जिल्ह्यात नाराजी

Water Scarcity : टंचाईमुळे नाशिक शहरात पाणीकपात; जून-जुलैमध्ये शनिवार बंद, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसांआड पुरवठा

Citroen Electric Car: ईव्ही क्षेत्रात सिट्रोएनचा मोठा दाव! जास्त फीचर्ससह परवडणारी E-C3X लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंम्मत

SCROLL FOR NEXT