father beating child.jpg 
नाशिक

'आई नको न रडू!'...असं म्हणत 'तो' ही रडू लागला...अन् तेवढ्यात 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जेलरोड) येथे पती-पत्नीच्या वादात आईला रडतांना बघून तो ही रडू लागला.
त्याचे ते रडणे ठरले शेवटचं....निघृण पित्याने रागाच्या भरात बॅट मारून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकारात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पत्नीच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांत पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पतीला अटक केली. 

अशी घडली घटना

सपना खंडारे (वय 25, रा. विराजनगर, गॅलॅक्‍सी इंग्लिश स्कूलसमोर, दसक, जेल रोड) या पती भीमराव व मुलगा आर्यन (वय 5) यांच्यासह राहते. मुलगी हर्षदा (वय 7) मालसेलू येथे आजोळी शिकण्यासाठी गेली आहे. पती भीमराव हा मजुरीचे काम करतो. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने डिसेंबरमध्ये तिला मारहाण केली होती. त्यामुळे सपना मुलांसह मालसेलू (जि. हिंगोली) येथे माहेरी निघून गेली होती. 27 जानेवारीला आधारकार्ड तयार करण्याच्या बहाण्याने भीमरावने सपनाला मुलासह नाशिकला येण्यास सांगितले. नाशिकला आल्यानंतर भीमराव दोन-तीन दिवस व्यवस्थित राहिला. 31 जानेवारीला सायंकाळी सहाला भीमराव कामावरून घरी आला. काही वेळानंतर त्याने आजारी पत्नीशी मागील भांडणाची कुरापत काढली. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुलाच्या खेळण्यातील लाकडी बॅटने तिला मारहाण केली. गंभीर मारहाणीमुळे आई रडू लागल्याचे पाहून पाच वर्षांचा मुलगा आर्यनही रडू लागला. त्यामुळे संतापलेल्या भीमरावने बॅटने मुलाला डोक्‍यावर व गुडघ्यावर मारहाण केली. त्या वेळी मुलगा व सपनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी भीमरावच्या मदतीने जखमी मुलाला दुचाकीवर बिटको रुग्णालयात नेले. नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आर्यनची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. उपचार घेत असताना 5 फेब्रुवारीला सकाळी साडे आठला त्याचा मृत्यू झाला. 

दोषी पित्याला अटक

मुंबई पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली. नंतर मुलाचा मृतदेह मालसेलू (हिंगोली) येथे नेऊन अंत्यसंस्कार केले. तिकडून नाशिकला आल्यावर सपनाने संबंधित प्रकाराबद्दल उपनगर पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी भीमराव खंडारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT