50 crore loss due to untimely rains in Pimpalgaon area Nashik 
नाशिक

पिंपळगाव परिसरात ५० कोटींचे नुकसान! अवकाळी ठरला ‘दुष्काळात तेरावा महिना’ 

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अवकाळी पावसाने द्राक्षनगरीची दाणादाण उडवून दिली. वादळी वाऱ्यासह पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले असून,  पावसाच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला आहे. अगोदर दराअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरला आहे. निफाड तालुक्यातील ५० लाख एकरांवरील द्राक्षबागांची तब्बल ५० कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

गुरुवारी (ता. १८) दुपारपासूनच आभाळात ढगांची गर्दी झाली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळगाव बसवंत, साकोरे (मिग), कोकणगाव, पालखेड, शिरवाडे वणी, आहेरगाव या द्राक्षबागांचे आगर असलेल्या परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली. टपोऱ्या थेंबांसह धुवाधार पावसाने द्राक्षबागा झोडपल्या. तुफान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने ग्रेप्स इंडस्ट्री चांगलीच हादरली. द्राक्षघडांना तडे जाण्याबरोबर दर्जा घसरण्याची भीती आहे. 

काढणीच्या द्राक्षाची नासाडी 

तीन वर्षांपासून विविध संकटांनी ग्रस्त शेतकऱ्यांनी लक्ष्मीधन विकून भांडवल उभे केले. निफाड तालुक्यात बहुतांश द्राक्षबागा परिपक्व झाल्या आहेत. मोठ्या अपेक्षेने व्यापाऱ्यांशी शेतकरी सौदे करीत आहेत. पण, आजचा पाऊस कर्दनकाळ ठरला. निफाड तालुक्यातील ५० लाख एकरांवरील द्राक्षबागांला अवकाळीने तडा दिला. द्राक्षमण्यांना तडे गेले असून, तासाभराच्या पावसाने स्वप्नावर पाणी फेरले आहे. तब्बल ५० कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निर्यातक्षम द्राक्षे स्थानिक बाजारपेठेतही विक्रीयोग्य राहिलेली नाहीत. द्राक्षबागेत घडांचा सडा पडल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT