नाशिक : कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने थकबाकीदारांकडे वसुलीसाठी महापालिकेचा तगादा वाढणार आहे. पाणीपुरवठा विभागासमोर पाच ते पंचवीस हजारांपेक्षा थकबाकी असलेल्या ५५ हजार ३६१ नळधारकांकडील ७३ कोटींहून अधिकच्या पाणीपट्टी वसुलीचे आव्हान आहे. थकबाकी वसुलीसाठी कर्मचारी कमी पडत असल्याचे खासगी ठेकेदार नियुक्ती महापालिकेच्या विचाराधीन आहे.
५५ हजार नळधारकांकडे ७३ कोटींहून अधिक थकबाकी
शहरात एक लाख ९० हजार ५४० घरगुती, तीन हजार ९२४ व्यावसायिक, चार हजार १०६ अव्यावसायिक असे एकूण एक लाख ९८ हजार ५७० नळकनेक्शन आहे. चालू आर्थिक वर्षासाठी थकबाकीसह १०९ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या आर्थिक वर्षात १७ कोटी आठ लाख रुपयांची वसुली झाली. पाच ते नऊ हजार ९९९ रुपयांची थकबाकी असलेले २९ हजार ३९६ नळधारक असून, त्यांच्याकडे वीस कोटी ७७ लाख ५० हजार ५९४ रुपये थकबाकी आहे. दहा ते १४ हजार ९९९ रुपयांपर्यंत १३ हजार ८११ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे सोळा कोटी ९३ लाख सहा हजार ४९५ रुपये थकबाकी आहे.
१९ कोटी चार लाख ४१४ रुपये थकबाकी
पंधरा हजार ते १४ हजार ९९९ रुपये थकबाकी असलेले नऊ हजार १९९ ग्राहक असून, त्यांच्याकडे सोळा कोटी ८२ लाख ७२ हजार २६२ रुपये थकबाकी आहे. पंचवीस हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या दोन हजार ९५५ थकबाकीदारांकडे १९ कोटी चार लाख ४१४ रुपये थकबाकी आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय स्तरावर वसुली वाढविण्याच्या सूचना दिल्या.
शासकीय कार्यालयांकडे चार कोटी
केंद्र व राज्य शासनाच्या ८४ विभागांच्या कार्यालयाकडे ४.२६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची बाब समोर आली आहे. पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी सेंट्रल रेल्वेकडे ६८.४० लाख रुपये आहे, तर भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडे ७१ लाख रुपये, करन्सी नोट प्रेसकडे २६ लाख ९३ हजार रुपये थकबाकी आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाकडे १.७६ लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १.७१ लाख, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे ३.३८ लाख रुपये, दारूबंदी अधीक्षक कार्यालयाकडे २.१२ लाख रुपये, भारत दूरसंचार निगम कार्यालयाकडे १०.१२ लाख रुपये, जिल्हा रुग्णालयाकडे २.४० लाख, सिडकोकडे ४.४३ लाख रुपये, महाराष्ट्र पोलिस अकादमीकडे १.३४ लाख रुपये थकबाकी आहे.
विभाग शासकीय कनेक्शन थकबाकी (रुपयांमध्ये)
सातपूर ०० ०० पूर्व १८ १२,१०,४२९
पश्चिम ७४ १,४०,४४,२७१
सिडको ०२ ६,२०,०८६
नाशिक रोड १८ २,६६,४६,४२४
पंचवटी ०३ १,५१,२९२
एकूण ११५ ४,२६,७२,५०२
नागरिक ५५३६१ ७३ कोटी ५७ लाख २९ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.