5G crime news
5G crime news esakal
नाशिक

5G Fraud Alert : सावधान! तुमचीही होऊ शकते फसवणूक

नरेश हाळणोर

नाशिक : टु-जी, थ्री-जी नंतर फोर-जी नेटवर्क आले. आता तर फाईव्ह-जी नेटवर्क सेवा सुरू झाल्याने प्रत्येक मोबाईलधारक ही सेवा आपल्या मोबाईलमध्ये असावी यासाठी उतावीळ झालेला आहे. मात्र, हा उतावीळपणा आपल्या अंगलट येऊ शकतो. कारण, हीच संधी साधत सायबर चोरटेही सक्रिय झाले असून मोबाईल धारकांची याच अपग्रेडेशनच्या प्रक्रियेत फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शहर सायबर पोलिसांनी नाशिककरांना सतर्कचेचा इशारा देत अनोळखी लिंकला ‘टच’ न करण्याचे आवाहन केले आहे. (5G Fraud Alert Beware You can also be cheated Nashik Latest Crime News)

भारतातही नुकतीच फाईव्ह-जी इंटरनेट सुविधेचा प्रारंभ झाला आहे. या माध्यमातून प्रत्येकापर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचविले जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच लाखो मोबाईल धारक फाईव्ह-जी इंटरनेट मोबाईलमध्ये अपग्रेड करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. हीच बाब हेरुन सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत.

फाईव्ह-जी सीमकार्ड तसेच मोबाईल अपडेट करुन देण्याचा बहाणा करून हे चोरटे मोबाईलधारकाला फॉर्म, बँक डिटेल, फी भरा व ‘केवायसी’ अपडेट करण्यास सांगून काही क्षणांतच बँक खात्यावर डल्ला मारण्याची शक्यता आहे. तुम्हाला आमच्या फोन स्टोअरमध्ये किंवा ऑफिसला येण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसूनच ही सेवा अपग्रेड करू शकता, असे सांगून आर्थिक फसवणुकीच्या घटनांची शक्यता जास्त असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले आहे.

ही घ्या दक्षता

* फाईव्ह जी सेवा अथवा सीमकार्ड घेताना ते मान्यताप्राप्त सर्व्हिस सेंटर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या स्टोअर वा गॅलरीत जाऊनच घ्यावे. तसेच तेथूनच अपग्रेड करुन घेणे.

* मोबाईलवर ५ जी सिमकार्ड प्रणाली अॅक्टिव्हेट करण्यासाठी आलेली कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नये.

*टीमव्हूअर, एनीडेस्क यासारखे स्क्रिन शेअरिंग अॅप डाउनलोड करू नयेत. इन्स्टॉल झाले असेल त्यांना सेटींगचा कोणताही अॅक्सेस देऊ नये. ते अनइंन्स्टॉल करावेत.

*कोणत्याही अॅप्लिकेशनमध्ये बँक डिटेल्स, अकाउंट नंबर, सीव्हीव्ही नंबर वा पॅनकार्ड तसेच एटीएम नंबर देऊ वा भरू नये.

* कोणत्याही फोन कॉलवर बँक खाते, एमआयसीआर, आयएफएससी कोडची माहिती देऊ नये. मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी अनोळखी व्यक्तीस शेअर करू नये.

*अनोळखी व्यक्तीकडून आलेला क्यूआर कोड स्कॅन करू नये.

*कोणत्याही अॅपमध्ये आपली माहिती किंवा बँक डिटेल्स भरू नये.

"आपण ऑनलाईन फसवणुकीचा फारसा संशय न येता संबंधित सायबर संशयितांच्या सांगण्याप्रमाणे प्रोसेस करतो. ती करु नये. अपग्रेडेशनच्या नावाखाली फसवणुकीबाबतची तक्रार अद्याप नाशिकध्ये दाखल नाही. भविष्यात अशा प्रकारची फसवणुक होण्याची मात्र दाट शक्यता आहे. फसवणूकीत बळी पडल्यास संबंधिताने तत्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर (एनसीसीआरपी) ऑनलाईन तक्रार करावी किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तकार नोंदवावी."

- सूरज बिजली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT