6 months imprisonment for holding police collar Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पोलिसाची कॉलर धरणाऱ्यास 6 महिन्यांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सेवेवर कार्यरत पोलिसाची कॉलर धरत शिवीगाळ करणाऱ्या संशयित आरोपीस न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (6 months imprisonment for holding police collar Nashik Crime News)

सेवेवर कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याची शर्टाची कॉलर धरत शिवीगाळ केल्याची घटना २५ ऑगस्ट २०१५ ला घडली होती.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शंतनू शंकर सोनवणे (रा. तेली गल्ली, जुने नाशिक) याच्याविरुद्ध शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्यामराव अहिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी तपास करीत न्यायालयात पुरावे सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक १) न्या. जी. पी. बावस्कर यांच्या न्यायालयात शुक्रवारी (ता. ११) सुनावणी झाली.

सुनावणीअंती आरोपीस सहा महिन्यांचा कारावास आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार, महापालिका आयुक्तांसोबतच्या भेटीत मागणी मान्य होणार?

Suhas kande : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय खेळी! आमदार सुहास कांदेंकडे नाशिक शिवसेनेची धुरा

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Pregnancy Chickpeas Benefits: गर्भधारणेत आवश्यक फॉलिक ॲसिड, कॅल्शिअम आणि लोह देणारे 'नैसर्गिक टॉनिक' म्हणजे चणे!

'पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका

SCROLL FOR NEXT