Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation esakal
नाशिक

Nashik News : पश्‍चिम विभागाकडून मालमत्ता जप्तीचे वॉरंट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका (MNC) पश्चिम विभागाकडून एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ६१ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यात आले आहे. २१ दिवसांच्या आत थकबाकी अदा न केल्यास मालमत्तांचे लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. (61 property owners with arrears of more than 1 lakh rupees were issued property seizure warrants by mnc West Division nashik news)

३१ पथकाच्या माध्यमातून अनधिकृत मिळकती शोधण्याची मोहीम नुकतीच पार पडली आहे. विभागीय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम नोटिसा पाठवण्यात आल्या, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा नोटिसा बजावण्यात आला आहे. पश्चिम विभागात एक लाख रुपयांवर ज्या थकबाकीदारांची थकबाकी आहे अशा मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यात आले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

६१ वॉरंट बजावण्यात आले असून, त्या मालमत्तांचे मूल्यांकन काढण्याचा प्रस्तावदेखील बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे. मालमत्ता जप्त करून त्यानंतर २१ दिवसांची नोटीस दिली जाईल. या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर अदा न केल्यास लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT